जत,(प्रतिनिधी): सर्वसामान्य
नागरिकांना चांगले रस्ते देण्याची जबाबदारी असलेल्या जतचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन्ही विभाग सर्वसामान्यांच्या जिवावर उठल्याचे तालुक्यात संतापजनक चित्र आहे. तालुक्याच्या अंतर्गत जवळपास सर्वच रस्त्यावर ठिकठिकाणी हजारो खड्डे पडले आहेत.
त्यात गेल्या काही दिवसातील पावसामुळे खड्ड्याचा घेर दुप्पट वाढला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भष्ट्र अधिकारी व ठेकेदारांच्या साखळीने तालुक्यातील रस्त्याची वाट लावली असून नव्याने केलेले रस्तेही महिन्याभरात खड्डेमय झाले आहेत.यामुळे वाहन धारकासह
नागरिकांमध्ये रोष उफाळून येत आहे.
सार्वजनिक विभागाचे सर्व अधिकारी,अभिंयते आंधळे, बहिरे आणि मुक्याचे सोंग घेत सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे चित्र आहे.मात्र सत्ताधारी आणि विरोधक गप्प का, याची प्रचिती येऊ लागली आहे.
वर्दळीच्या मार्गासह तालुक्यातील जवळपास सर्वच मार्गावर शेकडो खड्डे झाले आहेत.दुरूस्ती व निष्कारण स्वार्थासाठी शासनाच्या लाखो रूपयांचा चुराडा करणार्या सार्वजनिक विभागाला आपलेच नादुरूस्त रस्ते दिसू नये यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दररोज अपघात घडत असताना सार्वजनिक बांधकाम किती बळी हवे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात रिमझिम पाऊसाने डबकेच डबके तयार होत असल्याने वाहनधारकाना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
जत- सांगली या प्रमुख रस्त्यावर पडलेला जीवघेणा खड्डे या मार्गावरून जाणाऱ्या अधिकाऱ्यांना दिसत नाहीत हे विशेष..