घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अटकेत | 5 गुन्हे उघड ; सांगली शहर पोलीसाची कारवाई
सांगली : सांगली शहरात घरफोडीतील तीन रेकार्डवरील गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुशक्या आवळल्या आहेत.याप्रकरणी सराईत गुन्हेगार करण रामा पाटील( वय 21), रोहीत मधुकर गोसावी (वय 20), रोहीत बाळु सपाटे (वय19 वर्षे,सर्व रा. वाल्मिकी आवास योजना जुना बुधगाव रोड सांगली) यांना पकडले आहे.
या गुन्हेगारांनी सांगली ठाणे परिसरात 5 घरफोडी केल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.
पोलीस अधीक्षक श्री दिक्षितकुमार गेडाम,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा डुबुले,डिवायएसपी अशोक विरकर यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरी,घरफोडी यासारखं गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी पोलीस ठाणेकडील मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत कारवाया सुरू केल्या होत्या.शनिवारी ता.12 रोजी दुपारी 12 च्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस हवालदार
दिलीप जाधव व पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे करण रामा पाटील हा त्याचे साथीदारासह वाल्मिकी आवास येथील जुना जकात नाका येथे बसलेले आहेत.

मिळाल्या बातमीची खात्री करणेकरीता हवालदार दिलीप जाधव,पोलीस कॉन्स्टेबल जयवंत पवार व विक्रम खोत यांनी वाल्मिकी आवास सांगली या ठिकाणी जावून रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे चौकशी केली असता त्या तिघांनी व एका अल्पवयीन बालकाने मिळून सांगली शहर पोलीस पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबूली दिली आहे.संशयित आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व चोरी केलेला मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.पोलिस फौजदार हणमंत जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
सांगली : घरफोडीतील आरोपीसह पोलीसाचे पथक