मराठा आरक्षणासाठी डफळापूरमध्ये रास्तारोको | स्थगिती उठविण्याची मागणी ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण़्याचा इशारा

0



जत,प्रतिनिधी : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविणे, मराठा आरक्षण मिळण्याच्या मागणीकडे राजकीय पक्षांसह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी मराठा स्वराज्य संघाच्या वतीने डफळापूर मध्ये सांगली-जत मार्गावर रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले.



मराठा आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून मराठा स्वराज्य संघाच्या माध्यमातून जत तालुक्यात विविध आंदोलनाला सुरूवात झाली आहे. घटनातज्ज्ञ व कायदेविषयक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी, मराठा आरक्षण खंडित होऊ न देता पूर्ववत चालू ठेवावे यासह विविध मागण्यांसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.




 मराठा आरक्षण मिळालेच पाहिजेत, असे कसे देत नाहीत, घेतल्याशिवाय राहणार नाही यासह विविध घोषणाबाजी करीत पक्षाच्या नेत्यांचे लक्ष वेधले.मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक, अध्यक्ष महादेव सांळुखे,जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जतेत गुरूवारी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक तर शनिवारी सांगली-जत मार्गावर डफळापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.



महादेव सांळुखे म्हणाले,लोकसभा व राज्यसभेत मराठा आरक्षणाचा ठराव पास करावा,राज्य घटना परिशिष्ट 9 मध्ये त्यांचा समावेश करावा,त्यावर महामहिम राष्ट्रपतीची सही घ्यावी,तरच मराठा आरक्षण टिकाऊ होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे.त्यांनी राज्यात,केंद्रात सत्ता असतानाही टिकणारे आरक्षण दिले नाही.परिणामी मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजात प्रचंड संताप आहे.प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळालं.त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं.अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात ़येईल.

Rate Card



यावेळी बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर भोसले,सोसायटी संचालक राजू भोसले,वंसत चव्हाण, रमेश शिंदे, माजी उपसंरपच शहाजी जाधव, ग्रा.प.सदस्य देवदास पाटील,सागर चव्हाण, कॉ.हणमंत कोळी,दिपक चव्हाण,अशोक भोसले,मालोजी भोसले,संजय भोसले,श्री.यादव आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान नायब तहसीलदार श्री.माळी यांना मागण्याचे निवेदन देऊन आंदोलन मागे देण्यात आले.





मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जत-सांगली रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला.नायब तहसीलदार यांना मागण़्याचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.