जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर रस्त्याचे सिमेेंट रस्त्याचे काम गतीने सुरू करण्यात येत आहेत.बाजार समितीच्या इमारतीसमोरून काम सुरू करण्यात आले आहे.त्या परिसरातील एका लाईनचे काम करण्यात आले आहे.
जत शहरातील या प्रमुख मार्गाचे गेल्या दोन वर्षापासून काम अनेक अडचणीमुळे रखडले होते.मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरावस्था झाली होती.रस्त्याच्या रुंदीकरण,नगरपरिषदेच्या अडमुट्या भूमीकेमुळे रस्त्याचे काम सातत्याने रखडल्याचे आरोप होते.
अनेकवेळा आमदार विक्रमसिह सांवत,माजी आमदार विलासराव जगताप यांनी संबधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत काम गतीने करण्याच्या सुचना दिल्या होत्या.अखेर अडचणीतील विषयाच्या सुटकेनंतर काम सुरू करण्यात आले आहे. सध्या कामात गती आली आहे.
मजबूतीकरण,सिमेंटीकरणाची कामे सुरू आहेत.पुढील महिन्याभरात काम पुर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
जत शहरातील रस्त्याचे कामात गती आले आहे.








