वाळू तस्कराचे कर्दनकाळ दंबग तहसीलदार प्रंशात पिसाळ यांची बदली | शिवसेनेकडून आंनदोत्सव

0



जत,प्रतिनिधी : वाळू तस्कराचे कर्दनकाळ ठरलेले संख अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांची अखेर पुणे येथे बदली झाली आहे.त्यांच्या जागी हणमंत म्हेत्रे यांची नेमणूक झाली आहे.




जत पुर्व भागात नव्याने झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा दोन वर्षापुर्वी पिसाळ यांनी कार्यभार घेतला होता.तेव्हापासून त्यांनी या भागातील बोर नदी पात्रात बेसुमार वाळू तस्करीला लगाम लावला होता.




अगदी राजकीय झूल पांघरून वाळू तस्करीत गुंतलेल्या झारीतील शुक्रचार्यावरही कारवाईचा आसूड ओडला होता.त्यामुळे या भागात वाळू तस्करीला मोठ्या प्रमाणात अटकाव बसला होता.कार्यालयातील प्रशासनातही पिसाळ यांनी प्रभावी काम केले होते.त्यांच्या बदलीनंतर वाळू तस्करांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.



तहसीलदार बदलीबद्दल जिलेबी वाटप


संखचे अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी जत पूर्व भागातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी बांधकामासाठी रीतसर परवाना काढून वाळू घेतली असताना श्री. पिसाळ यांनी अन्यायकारक कारवाई करत भरमसाट दंड ठोठावला होता.त्याविरुद्ध आम्ही जत तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने आवाज उठवला. बदलीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते.अखेर आम्हाला न्याय मिळाल्याचे भावना युवासेनेचे तालुका उप प्रमुख प्रवीण अवराधी यांनी व्यक्त केली.

Rate Card

पिसाळ यांच्या बदलीचे आदेश

झाल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे

व जिलेबी वाटून जल्लोष केला. 


 



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.