तुकाराम बाबा,आ.सुरेश धस यांचा असाही योगायोग

0जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील स्वातंत्र्यापासून सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या गावांना पाणी देण्याचा विडा उचलेले हभप तुकाराम महाराज यांनी मुंबई येथे काढलेल्या पायीदिंडी दरम्यान,टिव्ही 9 ने घेतलेल्या रोखठोक कार्यक्रमातील विश्लेषक असलेले तुकाराम बाबा व माजी मंत्री आमदार सुरेश धस यांचा सहभाग होता.
योगायोग म्हणजे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात ता.30 संप्टेबर रोजी माजी मंत्री सुरेश धस हे हभप तुकाराम बाबा यांच्या मठात आले होते.दोघाची हि भेट योगायोगाची व उल्लेखनीय ठरली.जत तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी काम करणारे हभप तुकाराम बाबा यांनी संख ते मुंबई पायी दिंडी काढत तत्कालीन युक्ती सरकार दरबारी जत पुर्व भागातील परिस्थिती मांडली होती.त्या दरम्यान टिव्ही 9 टिव्हीने याबाबत रोखठोक कार्यक्रमात चर्चासत्र आयोजित केले होते.
त्या चर्चासत्रात विविध प्रश्नावर प्रभावी काम करणारे तत्कालीन मंत्री सुरेश धस व पाणी प्रश्नासाठी काम करणारे हभप तुकाराम बाबा यांची प्रश्नाची देवाणघेवाण झाली होती.त्यावेळी धस यांना तुकाराम बाबाची ओळख नव्हती.त्यानंतर योगायोगाने माजी मंत्री आमदार सुरेश धस,आमदार गोपीचंद पडळकर हे ऊसतोड मजूरांच्या प्रश्नासाठी मेळावा घेण्यासाठी जत तालुक्यात आले होते.त्यांनी संख येथील तुकाराम बाबा यांच्या मंगल कार्यालयात हा मेळावा घेतला.


Rate Cardत्यावेळी माजी मंत्री धस व तुकाराम बाबाची भेट झाली.बाबानी त्यांना टिव्ही 9 च्या कार्यक्रमाची आठवण करून दिली.बाबानी सुरू केलेल्या मोहिमेला आम्हचा पाठिंबा असेल,लोकांच्या प्रश्नासाठी आपण एकत्र लढू,असेही आश्वासन आमदार धस यांनी तुकाराम बाबांना दिले आहे.


संख ता.जत येथे माजी मंत्री आ.सुरेश धस व हभप तुकाराम बाबाची भेट झाली.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.