जत,प्रतिनिधी : अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अशी ज्यांची महसूल विभागात एक वेगळी ओळख आहे,असे आवंढी गावचे सुपुत्र डी.एस.कुंभार यांची मिरज तहसीलदार म्हणून नेमणूक झाली आहे.
यापुर्वी पलूस,शाहूवाडी,राधानगरी,पुणे आयुक्तालय,सोलापूर,बार्शी,
हवेली या ठिकाणी अतिशय उत्कृष्ठ दबंग अधिकारी म्हणून कुंभार यांची ओळख आहे.या कामाची दखल घेत मिरज सारख्या अति संवेदनशील तालुक्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्वक काम त्यांनी केले आहे.सध्या तहसीलदार कुंभार यांच्यासमोर मिरज तालुक्यातील कोरोनाला नियंत्रणात आणून तालुक्यातील तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी काम करण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.








