डफळापूर-अंनतपूर रस्ता मुत्यूचा सापळा | पुन्हा ट्रक पलटी होता,होता वाचला

0डफळापूर,वार्ताहर : जत पश्चिम भागातील  महाराष्ट्र व कर्नाटकातील गावांना जोडणारा डफळापूर-अंनतपूर रस्ता मुत्यू सापळा बनला आहे.रस्त्यावर पाच-पाच फुटापर्यत खड्डे पडले आहेत.या रस्त्याची अनेकवेळा दुरूस्ती करून कोट्यावधीचा निधी खर्च केला आहे.दोन राज्यांना जोणाऱ्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक व प्रवाशी वाहतूक होत असते.रस्त्याचे काम करताना मजबूतीकरण व्यवस्थित करण्यात आलेले नाही.त्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी सुमारे चार-पाच फुटापर्यत दबला आहे.त्यातच गेल्या काही महिन्यापुर्वी एका मोबाईल कंपनीने फायबर केबल टाकण्यासाठी थेट रस्ताच खोदला आहे.त्याठिकाणी गेल्या काही दिवसातील पावसामुळे या ठिकाणी थेट रस्त्यावर नाला बनला आहे.त्यातच पावसाचे पाणी थांबून राहत आहे.रस्त्याची दुरावस्था व मोबाईल कंपनीच्या हितासाठी खोदलेले रस्ता यामुळे आंतरराज्यीय रस्त्याची पांणद रस्त्यासारखी आवस्था झाली आहे.दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाही.इतकी बिकट अवस्था या रस्ताची झाली आहे.वाहनाना बाजू देताना दररोज 10-15 वाहने या रस्त्यावर रुतली जात आहेत.त्यामुळे अवजड वाहने पलटी होण्याचे प्रमाण नित्याचे बनले आहेत.त्याशिवाय अडकलेली वाहने काढण्यासाठी वाहनधारकांना क्रेन,जेसीबीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

Rate Card

जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्जाहिन कामाचा हा आदर्श नमुना असणारा रस्ता आहे.प्रत्येक वेळी दुरूस्तीचे काम केल्यानंतर अगदी महिन्याभरात या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.खर्ची झालेला निधी नेमका रस्ता दुरूस्तीसाठी होता.की ठेकेदार अधिकारी पोसण्यासाठी असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.