ही तर एकाधिकारशाही

0



देशात महिलांवरील अत्याचारांचे लोट उसळत आहेत. महिलांना असुरक्षितता जाणवत आहे. झालेले अत्याचार ऐकूनच अंगाला शहारे येत आहेत. भयानक शांतता दिसत आहे. महिला ही देशाची शक्ती आहे. देशाच्या शक्ती वरच आघात होत असताना बलशाली राष्ट्रांची स्वप्न कसे साकार होईल? ज्या घटना घडत आहेत त्या घटनांवर अंकुश राहिला नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या लोकशाही मजबूत म्हणणाऱ्या देशाला शोभेल काय? नारी शक्तीचा आदर ,सन्मान ही फक्त लेबल दिसत आहेत.




 इतिहास विसरायचा प्रयत्न केला तर नवीन वर्तमानकाळ महाभयंकर जन्म घेऊन उभा आहे. देशाची पावले प्रगतीकडे न पडता व्याभिचार करण्याकडे पडत आहेत. निर्भया प्रकरणात नवीन पद्धतीने अन्याय-अत्याचारातून भरच पडत आहे. उत्तर प्रदेश मधील हाथरस सामूहिक दुष्कर्म घटना निंदनीय आहे. एका घटनेतून असेच सावरतोय तोच राज्यात बुलंद शहर, बलरामपुर मध्ये दुष्कर्म घटनांनी जन्म घेतला. आजमगड मध्ये आठ वर्षीय मुलीवर दुष्कर्म. गंभीर अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल केले. दुसरी घटना बुलंद शहर तर गोसारी भागातील बावीस वर्षे दलित युवतीवर दुष्कर्म करून तिचा मृत्यू झाला. यूपीतील कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर आलेली ही ठळक उदाहरणे आहेत.योगी सरकारने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असताना त्याला मिळालेले हे चॅलेंज कितपत ते पेलू शकतात, यांचा भविष्यात वेध येईलच!



लोकशाहीचे वाभाडे काढणाऱ्या या देशात सामान्य, दलित जनता  तडफडत आहे. गरिबांचा वाली, स्त्रियांना मिळणारी असुरक्षित भावना हे लोकशाहीला घातक आहे. देशातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन धक्काबुक्की करणे. ही हुकुमशाहीची नांदी म्हणावी लागेल का? एवढ्या महामहीम नेतृत्वावर हल्लाबोल म्हणजे येणारी हुकूमशाहीचा जन्म घेत आहे म्हणावे का? लज्जास्पद गोष्टी सांभाळण्यात सरकारला यश मिळत नाही.पण देशावर एक छत्री अमल ठेवण्यात सरकारची दिशादर्शकता, दूरदृष्टी निश्चितच दिसते. ही लोकशाहीची हत्या म्हणावी लागेल!


Rate Card

चंद्रकांत कांबळे उमरगा, उस्मानाबाद

7038269331 



shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.