बेवनूर ते जुनोनी रस्त्याची दुरावस्था | तात्काळ रस्ता दुरुस्त करा ; संभाजी बिग्रेड

0जत,प्रतिनिधी : डी बी एल कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व अपघाती गतिरोधक काढणेबाबत तसेच गतिरोधकामुळे अपघात झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी तहसिलदारसो सचिन पाटील गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.बेवनूर ते जुनोनी हा रस्ता डी बी एल कंपनीच्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे बेवनूर ते जुनोनी हा रस्ता पुर्णपणे खचून मोठमोठे खडे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी,वाहने चालवताना अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.अशा परिस्थितीत वाहनांचे तर नुकसान होतच आहे.परंतु जीवितास हानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे.आतापर्यत बेवनूरचे दादासो शंकर सरगर 24 संप्टेबरला, वसंत धोंडीराम माने 30 संप्टेबर या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले आहेत. बेकायदेशीर गतिरोधकामुळे व डीबीएल कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. संबधित विभाग व डी.बी.एल कंपनी जबाबदार असून या रस्त्यावर अपघात

झालेल्या दोन्ही व्यक्तींची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.त्यांच्याकडे उपचारासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी व प्रशासन तसेच डीबीएल कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.रस्त्यावर असलेले बेकायदेशीर गतिरोधक तात्काळ काढण्यात यावेत,भविष्यात होणारे  अपघात टाळावेत.अन्यथा संभाजी ब्रिगेडच्यावतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनात दिला आहे.

Rate Cardनिवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक,जिल्हाउपाध्यक्ष डॉ.सुधिर नाईक,जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटील,सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत,संदिप नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.बेवनूर ते जुनोनी नादुरूस्त रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.