जतेत 52 जण कोरोनामुक्त | तिघांचा मुत्यू : नवे 25 रुग्ण
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात नवीन पॉझिटिव्ह रूग्णाच्या दुप्पट 51 कोरोना मुक्त झाले आहेत.तर दुसरीकडे तिघाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोना मुक्त संख्या वाढली आहे.मात्र सातत्याने होणारे मुत्यू चिंता वाढवत आहे.
तालुक्यात गत आठवड्यापासून कोरोना बाधित संख्या कमी होत आहे.तर कोरोना मुक्त होणारी संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तालुक्यात आतापर्यत 43 जणाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. सातत्याने होणाऱ्या रुग्णाच्या मुत्यूमुळे भिती कायम आहे.जत शहरातील वाढणारी रुग्ण संख्या शहराची चिंता कायम आहे.नगरपरिषद प्रशासन,नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जत शहराची कोरोना बाधित संख्या 400 पर्यंत पोहचली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव रोकण्यात आरोग्य विभाग,स्थानिक ग्रामपंचायती,व्यापारी व नागरिकांचे सहकार्य फलदायी ठरत आहे.
काही अपवाद गावे वगळता,तालुक्याचा कोरोनाचा आलेख खाली उतरत आहे.
एकीकडे कोरोना नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत.तर दुसरीकडे कोरोना मुक्त होणारी संख्या दुप्पटीने वाढत आहे.शुक्रवारी तालुक्यात 51 जण कोरोना मुक्त झाले आहेत.सध्या 276 रूग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शुक्रवार तालुक्यात 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

त्यात जत शहर 10,संख 1,बिळूर 1,कुंभारी 2,काराजनगी 2,रामपूर 4,बिरनाळ 1,कंठी 1,अंत्राळ 1,शिंगनहळ्ळी 1,गोंधळेवाडी 1येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्याची संख्या यामुळे 1268 वर पोहचली आहे.दुसरीकडे कोरोना मुक्त होणारी संख्या 949 झाली आहे.
नागरिकांनी हलगर्जीपणा टाळावा
जत तालुक्यात कोरोना प्रभाव रोकण्यात यश येत आहेत.नवे रुग्ण कमी होतायेत.दुसरीकडे कोरोना मुक्त होणारी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.प्रशासकीय स्तरावर आमचे सर्व विभाग प्रभावी काम करत आहे.त्याचे फळ मिळत आहे.तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.नागरिकांनी हलगर्जीपणा टाळावा सोशल डिस्टसिंग,मास्कचा वापर,सँनिटायझरचा वापर करावा.स्व:तासह कुंटुबियाची काळजी घ्यावी.
सचिन पाटील,तहसीलदार जत