शिराळा : शिराळा तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन व भुईमुग काढणी व मळणीला गती आली आहे.चालु वर्षी अवेळी पाऊस,ढगाळ वातावरण व वातावरणातील बदलामुळे सुरवातीच्या काळात जोमात आलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव व त्यानंतर झालेली अतिवृष्टी याचा फटका खरीप हंगामातील पिकांना चांगलाच बसला आहे.
चालू वर्षी सोयाबीनच्या बियाणातील दोष त्यातच एकसारखा पडलेला मुसळधार पावसामुळे भुईमुग व सोयाबीनच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट झाली असून कीटकांच्या हल्ल्यामुळे यंदा सोयाबीनचे व भुईमुगाचे जवळपास 30 टक्के उत्पादन घटणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तर हमीभावाप्रमाने खरेदी होत नसल्यामुळे त्याचा लाभ खरेदीदारांनाच होत असून शासकीय यंत्रनेचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
चालू वर्षीच्या हंगामासाठी 7 हजार रूपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला आहे मात्र हमीभावाच्या निम्यांनेही प्रत्यक्षात खरेदी होत असल्याने शेतक-यांच्याच तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे दर मिळावा अशी मागणी शेतक-याच्यातून जोर धरी लागली आहे.
शिराळा परिसरात सोयाबीन पिकाच्या मळणीच्या कामात व्यस्त असलेली शेतकरी








