जत शहरातील सिसिटीव्ही कॅमेरे बंद | चोऱ्यांच्या घटना घडल्यावर दुरूस्ती करणार काय ?; व्यापाऱ्यांचा सवाल

0



जत,प्रतिनिधी : जत शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत लोकवर्गणीतून बसविण्यात आलेले सिसिटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून हे कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती शहरात निर्माण झालेली आहे.




जत तालुक्यातील जत ही मुख्य बाजारपेठ असून मंगळवारी व गुरुवारी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात.गेल्या वर्षात बाजारपेठेत  चोऱ्याचे प्रमाण वाढले होते.अनेक दुकाने फोडून चोरट्यांने लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता.बाजारपेठेत वारंवार होत असलेल्या चोऱ्यामुळे व्यापारी धास्तावले होते.यामुळे जत व्यापारी असोसिएशन,नगरसेवक उमेश सावंत व जत पोलीस ठाणे यांच्या पुढाकाराने जतच्या बाजारपेठेत 13 सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.त्यानंतर चोरीच्या घटना घटल्या होत्या.परिणामी व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत होते.



दरम्यान संचारबंदीच्या अगोदर एका अज्ञात वाहनांच्या धडकेत सिसिटीव्ही कॅमेरा कंट्रोल बॉक्सचे नुकसान झाल्याने सिसिटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत.तेव्हापासून ही सीसीटिव्ही बंद पडले आहेत.त्यामुळे चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय शहरातील वाहतूक व्यवस्थेवरचे नियंत्रण ठेवणे पोलीसांना मर्यादा पडत आहेत.




भविष्यात एकादी घटना घडल्यानंतर सीसीटिव्ही दुरूस्त करणार काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. नगरपरिषद,अथवा पोलीसांनी हे सीसीटिव्ही सिस्टम दुरूस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.


Rate Card




दुरुस्ती खर्च करायचा कुणी


जतेत बसविण्यात आलेले 13 सीसीटिव्हीचा संच,जोडणी नगरसेवक उमेश सांवत यांच्या पुढाकारातून काही स्व:ता सांवत व व्यापाऱ्यांनी वर्गणी करून बसविले होते.बंद पडलेले सीसीटिव्हीचा दुरूस्ती खर्च करायचा कुणी यामुळे गेल्या सहा महिन्यापासून ते बंद पडले आहेत.यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागणारचं आहे.



 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.