जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील व्हसपेठ येथील हरिराम वालाजी चौधरी या व्यापाऱ्यावर हल्ला करून जबरीने गळ्यातीत सोन्याची चेन,व मोबाइल काढून नेहल्या प्रकरणातील आरोपींना जत पोलीसांनी काही तासात जेरबंद केले.याप्रकरणी मंजूनाथ रेवाण्णा तळसंगी (वय 24),रियाज सिकंदर ताबोंळी(वय 23),प्रकाश हणमंत तुळजानवार(वय 25,सर्वजण रा.उंटवाडी)या तिघांच्या मुशक्या आवळल्या आहेत.तर अन्य एकजण अद्याप फरारी आहे.तिघांना जत न्यायालयात हजर केले असते,त्यांना 30 सप्टेंबर पर्यत पोंलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,व्हसपेठ येथील हरिराम चौधरी यांचे उमदी रोडवरील पेट्रोल पंपानजिक बिल्डिंग साहित्य विक्रीचे दुकान आहे.दररोजप्रमाणे ते दुकानात बसले असताना शुक्रवारी सायकांळी संशयित मंजुनाथ तळसंगी,रियाज तांबोळी,प्रकाश उर्फ प्रशांत तुळजानवर व अन्य एकजण अशा चौघांनी तोंडाला मास्क लावत चौधरी यांना लोखंडी गज व फरशीने मारहाण करत गळ्यातील सोन्याची चैन,मोबाइल पळवून नेहला होता.ही सर्व घटना दुकानातील सीसीटिव्हीत कैद झाली होती.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी तपासाची सुत्रे हलविली होती पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते,
पोलिस कर्मचारी लक्ष्मण बंडगर,उमर फकीर,केरबा चव्हाण यांचे पथक तपासासाठी नेमण्यात आले होते.पथकांने सीसीटिव्हीतील दृश्याचा आधार व चौधरीकडील माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढत एकाला उंटवाडीतून तर दोघांना सांगली येथून सापळा रचून जेरबंद केले.तर एकजण फरारी झाला आहे.
तिघांना संशयिताना जत न्यायालयाने 30 संप्टेबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.फरारी एकाचा शोध सुरू आहे.अधिक तपास सा.पो.नि.महेश मोहिते करत आहेत.









