संशयित आरोपीचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न
जत,प्रतिनिधी : भंगार चोरीच्या प्रकरणी चौकशीसाठी बोलविण्यात आलेल्या संशयित आरोपी सुभाष वाघमोडे यांने पोलीस ठाण्याच्या आवारात साँनिटाझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलीसांनी तात्काळ वाघमोडे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.उपचारानंतर वाघमोेडेला त्यांच्या आई-वडीलाच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,काही दिवसांपूर्वी जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोळेकर वस्तीजवळ बंद पडलेल्या स्टोन क्रशर येथील भंगाराची चोरी झाली होती.
याप्रकरणी दोन संशयित आरोपींना जत पोलिसांनी अटक केली आहे.या दोघां आरोपींनी हे भंगार सुभाष वाघमोडे यांच्या दुकानात विकल्याची कबुली पोलीसांना दिली होती.त्या अनुषंगाने जत पोलिसांनी सुभाष वाघमोडे याला नोटीस देऊन चौकशीसाठी ठाण्यात बोलवले होते.रवीवारी तीनच्या सुमारास वाघमोडे ठाण्यात आला होता.कारवाई होण्याची भितीने पोलीस इतर कायदेशीर कागदपत्रे करण्यात गुंतल्याचे पाहत,वाघमोडे यांने
स्व:ता आणलेले सँनिटायझर प्राशन केले.
त्याला त्रास होत असल्याचे लक्षात येत पोलीसांनी त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.दरम्यान अचानक घडलेल्या घटनेने पोलीसाची पळापळ झाली.वाघमोडे वर उपचार करून त्याला वडिलाच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पोलीसाकडून देण्यात आली.
भंगार,सोनारांनी खबरदारी घ्यावी

जत पोलीस ठाणे आवारातील सोने-चांदी व भंगार खरेदी करणाऱ्या दुकानदारांनी जूने साहित्य घेताना खबरदारी घ्यावी.कोणत्याही प्रकारे अनओळखी इसमाकडून साहित्य खरेदी करू नये,असे साहित्य खरेदी केल्याचे आढळून आल्यास अशा दुकानदारावर कठोर कारवाई करण्यात येईल.
उत्तम जाधव
पोलिस निरिक्षक,जत