दिनकर पंतगे यांना ‘कोविडयोध्दा’ पुरस्काराने गौरव

0



जत,प्रतिनिधी : जत येथील शिवसेना नेते दिनकर पंतगे यांना कोविड योध्दा,व कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.इचलकरंजी येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने सन 2020-21चा ‘कोविडयोध्दा’ हा पुरस्कार पंतगे यांना देण्यात आला आहे.




 सहदेव माळी उर्फ एम.जगदीश,जत यांना कलाभूषण या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

राज्य चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष  धनाजी यमकर,तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री मंजुश्री खेत्री,अभिनेते राहुल राजशेखर,शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रकाश निकम यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 




यावेळी श्रमशक्ती एकता सामाजिक संस्थेचे संचालक अमित काकडे टेलिफिल्म ‘जागल्या’ चे सर्व कलाकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.

Rate Card






शिवसेना नेते दिनकर पंतगे यांना कोविड योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.