धोनीवरील टीका योग्यच

0
2

महेंद्रसिंह धोनी हा भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून प्रसिद्ध आहे. एकदिवसीय विश्‍वचषक, आयसीसी चषक, ट्वेंटी-ट्वेंटी या प्रकारातील धोनीचे निर्भेळ यश आहे.धोनीचा क्रिकेट काळ सुवर्णकाळ समजला जातो. त्याच्या काळाला सचिन रुपी सोनेरी किनार आहे.



यात धोनीला यशोशिखरावर पोहोचवणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भूमिका अहम आहे. स्व हितापेक्षा सघंहिताला प्राधान्य देणारा सचिन तेंडुलकर कर्णधाराचा त्याग करून आपला वारस धोनीला निवडला. कर्णधाराची जबाबदारी समर्थपणे पेलू शकणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनीला प्राधान्य देणारा सचिन तेंडुलकर महानच म्हणावे लागेल.




 क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. मग त्याला खेळाडूही अपवाद कसा असू शकेल? काळाप्रमाणे बदल होत जाणारच. संघाला धोनीची गरज होती तेव्हा त्याने अगदी अचूकपणे खेळाडूकडून हेरून काम फत्ते केले. प्रचंड अनुभव पाठीशी असताना, वेगळे स्ट्रोक्स करून प्रेक्षकांची मने जिंकणारा, हेलिकॉप्टर शॉट ने पारडे जड करणारा, फिनिशर ची भूमिका बजावणारा धोनी आज संघाचे मनोबल निर्माण करण्यात कमी पडताना दिसतोय.




संघातील खेळाडू जेव्हा चांगली कामगिरी करतात तेव्हा कर्णधार यशस्वी समजला जातो. कर्णधाराची कारकीर्द खेळाडूंवर अवलंबून असते. धोनीचे नशीब खेळाडू नेच साकारले आहे.2011 विश्व चषकामध्ये गंभीरची कामगिरी अप्रतिम झाली होती. युवराज सिंगने देखील तेवढीच अत्युच्च कामगिरी केली होती. जेव्हा यशस्वी खेळाडू फ्लॉप ठरतो तेव्हा त्याला डच्चू दिला जातो. कर्णधार  आपले स्थान संघात अबाधित ठेवतो. त्याला मिळत नाही. भारतीय इतिहासात धोनीच्‍या विजयात खेळाडूने केली यशस्वी कामगिरीच दिसते.




सध्या आयपीएलमध्ये चाच पडणारा धोनी बॅकफूटवर आलेला दिसतोय. खेळाडूला ऊर्जितावस्था देण्यास असमर्थ ठरतोय. आत्मविश्वासाची कमतरता दिसते. धोनी स्वतः कबुली देतो की, आमची गोलंदाजी ,फलंदाजी चांगली झाली नाही याला जबाबदार कोण? धोनीच्या फलंदाजी क्रमाबद्दल अनेक नाराज आहेत. आकाश चोप्रा ने रैना ची कमतरता जाणवते असे वक्तव्य केले. भारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज मुलतान का सुलतान वीरेंद्र सेहवाग याने संघाला पुढील सामन्यात ग्लूकोज  ची आवश्यकता असे ट्रोल केले. अनेक माजी खेळाडू कडून दोन्ही टीकेचे लक्ष बनतोय.




भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याने असे म्हटले, ‘पाठीमागे राहून युद्ध जिंकता येत नाही.’लष्करात असे म्हटले जाते की ज्यावेळी सैन्याचा जनरल मैदानावर उतरतो तेव्हा ते युद्ध संपल्याची चिन्ह असते. त्यासाठी प्रतिभावान  खेळाडू कडून आघाडीला येऊन युद्ध जिंकण्याची अपेक्षा असते. प्रदीर्घ अनुभवातून नवोदितांना आपल्या कृतीतून पाठ देणे गरजेचे असते.



जिथे संघाचा संकट मोचकच मागे रा हतो त्या संघाची अवस्था आपण पाहिली आहे. गौतम गंभीर केलेली टीका देखील योग्य वाटते कारण संकटात संघाला सावरण्याची जिम्मेदारी कर्णधाराची असते. हरणाऱ्या संघाची मागे राहून रणनीती आखून काय उपयोग?  समालोचकानी  धोनीच्या रण नीतीला दोष दिले आहेत. एकंदरीत चेन्नई सुपर किंग्स चा आत्मविश्वास ढळलेला दिसून येत आहे.






चंद्रकांत कांबळे,उमरगा(उस्मानाबाद) 

7038269331 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here