विजयंत्रणा हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नाही | जत तालुक्यातील स्थिती

0

जत,प्रतिनिधी : वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहरासह जत तालुक्यातील वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे.




विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.

बुधवारी वीज खंडित झाल्याचा फटका बुटीबोरीतील लोकांनादेखील बसला. वीज गेली आणि काही तास विज गायब असते.


Rate Card



 असे प्रकार कमी आहेत.मात्र ग्रामीण भागात अगदी चोवीस चोवीस तास विज पुरवठा खंडीत असतो.

कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते वातावरण बदल झाल्याने असे घडले आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ग्रामीण भागात कंपनीचे लक्ष नाही. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात कंपनीने वातावरणातील बदलाचे कारण सांगून हात वर केले. त्यांचे म्हणणे आहे की पाऊस जोरदार झाला. वीजसुद्धा कोसळली. कंपनीने तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.