शिक्षकांच्या वेतनाची अद्यावत माहिती एका क्लिकवर तंत्रस्नेही शिक्षक | एस.आर.होसमनी यांच्या प्रयत्नाला यश

0



सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील उमदी केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचा पगार एका क्लिकवर घरबसल्या बघावयास मिळणार आहे. जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा उमराणीचे तंत्रस्रेही शिक्षक एस.आर.होसमनी (बिरादार)मूळ गाव- जाडरबोबलाद या शिक्षकाने प्रायोगिक नमुना म्हणून इ-सॅलरी अ‍ॅपची निर्मिती केली असून थोड्याच दिवसात संपूर्ण तालुक्यातील आठावीस केंद्रातील सर्व शिक्षकांचा पगार एका क्लिकवर संकलीत करून इ-सॅलरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे.




याबद्दल तंत्रस्नेही शिक्षक होसमनी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इ-सॅलरी अ‍ॅपमुळे उमदी केंद्रातील 67 प्राथमिक शिक्षकांना एकाच क्लिकवर आपले वेतन घरबसल्या पहायला मिळणार आहे.तसेच त्यांना वार्षिक विवरण पत्रकही याद्वारे वर्षाकाठी उपलब्ध होणार असून, इन्कमटॅक्ससाठी त्याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक आयडी व पासवर्ड असल्यामुळे त्याची गोपनीयता राखली जाणार आहे.संपूर्ण जत तालुक्यात इ-सॅलरी अँपची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.या ऑनलाईन इ-सॅलरी अँपमुळे शिक्षकांना आपले वेतन व सर्व प्रकारच्या कपाती व इतर सर्व बाबी घरबसल्या या अँपद्वारे ऑनलाईन बघता येणार आहे.




जर ही सुविधा जत तालुका आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यात वापरल्यास पगारदार शिक्षकांची चांगली सोय होणार असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.पगार व कपातीची रक्कम एका क्लिकवरून इ-सॅलरी अँपवर पाहायला मिळत असल्याने जत तालुक्यातील शिक्षकातून प्रायोगिक स्वरूपात केलेल्या कामाचे कौतुक आणि समाधान व्यक्त केले जात आहे. इ-सॅलरी अँप तयार करण्यासाठी जत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Rate Card




तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जत तालुका उपाध्यक्ष रमेश कोळी यांचे सहकार्य व काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हाकार्याध्यक्ष लखन होनमोरे यांच्या प्रेरणेमुळे हे शक्य झाल्याचे आणि आणि उमदी केंद्राचे केंद्रप्रमुख सौ. रजपूत मॅडम, शिक्षक प्रकाश माळी, वरिष्ठ मुख्याध्यापक सिद्राय चिक्कलकी यांचे मदत लाभल्याचे होसमनी यांनी सांगितले.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.