ज्ञानाची कवाडे उघडा | सार्वजनिक वाचनालये खुली करा

0

सार्वजनिक ग्रंथालये दिनांक 30 सप्टेंबर 29 अखेर बंद ठेवा असे शासनाचे आदेश आहेत.तथापी सार्वजनिक ग्रंथालयामधील ग्रंथ देवघेव विभाग चालू ठेवा अशी वाचक वर्गातून मागणी होत आहे.शासनाच्या परिपत्रकानुसार मुक्तव्दार वाचन कक्ष तसेच ग्रंथ देवघेव बंद ठेवा,असे शासनाचे परिपत्रक असल्यामुळे वाचनालयामध्ये गेले तरी ग्रंथपाल पुस्तके देण्याच्या मनस्थितीत नाहीत.शासनाच्या परिपत्रकाचे कारण पुढे करुन पुस्तके देणेस नकार देतात.
सध्या कोवीडची महामारी चालू असल्यामुळे गुड मॉर्नीग ऐवजी स्वताःची काळजी घ्या.घरी बसा बाहेर पडू नका,असे मेसेज येतात.तेव्हा घरी किती दिवस बसून रहाणार आणि काय करणार असा प्रश्न सर्वसामान्याच्या पुढे पडला आहे.घरबसल्या पुस्तके वाचावीत,पुस्तकामध्ये रममान व्हावे . असे वाटते मात्र सार्वजनिक ग्रंथालयामध्ये पुस्तक देवघेव बंद असल्यामुळे ग्रंथालयांचे उघड दार देवा आता म्हणण्यापलीकडे वाचकांच्या हातामध्ये काही राहीलेले नाही.
सोशल डिस्टन्सींगचा नियम पाळून सार्वजनिक ग्रंथालयातील पुस्तक देवघेव विभाग चालू करावा अशी वाचक वर्गातून मागणी होत आहेे. शासनाने बिअरबार,वाईनशॉप, मॉल चालू केले.जिल्हाबंदी उठवली तशीच सार्वजनिक ग्रंथालयावरील बंदी उठवावी व ज्ञानाची कवाडे खुली करुन द्यावी ही मागणी होत आहे.सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 325 शासनमान्य वाचनालयाची संख्या आहे तर राज्यामध्ये ती 12,800 इतकी असून जिल्ह्यातील वाचक संख्या 80 हजार ते 1 लाखाच्या आसपास आहे.


Rate Cardराज्याचा हा आकडा कोटीमध्ये असू शकतो.एवढे वाचक वाचन चळवळीपासून दूरावलेले आहेत. या शिवाय नवीन वाचक वर्ग देखील वाचनालयाकडे आकृष्ट होत आहे.तेव्हा कोवीड कालावधीमध्ये वाचकांच्या मागणीचा विचार करता त्यांच्यासाठी ग्रंथ देवघेव विभाग चालू करणेस शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे कोरोना आणि वाचनालये कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून माराष्ट्र राज्यातील एकूण एक वाचनालागे पद आहेत. शासकीय आदेशानुसार वाचनालयातील सर्व व्यवहार बंद ठेवून कोरोना ससर्ग टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाचनालयातील पुस्तक देवपेव, मुक्तद्वार विभाग,व इतर सर्व विभाग बंद आहेत.
 या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबविणे बंद आहे. पुस्तक विभाग बंद असल्यामुळे वाचकांना पुस्तक वाचयता मिळेनाशी झाली आहेत.यापूर्वी वाचकाना बेज नसायचा पुस्तके वाचायला आणि आता वेळ आहे पण वाचनालग पांद असल्यामुळे पुस्तके नाहीत अशी अवस्था लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात वेळ घालवण्यासाठी मोबाईल,टिव्ही, इंटरनेटचा वापर लोकांनी करून पाहिला परंतु आता ते रटाळवाणे वाटू लागल्याने आता लोक वाचनालये कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पहात आहेत,तशी इच्छा व्यक्त करत आहेत.मनोरंजन व अभ्यासासाठी पुस्तकाशिवाय तरणोपाय नाही हे आता लोकांच्या लक्षात येतू लागले आहे. मागील सहा महिने वाचनालये पूर्ण बंद असल्यामुळे ग्रंथालयातील पुस्तकांना वाळवी किड सदृश्य हानिकारक जीवांचा संसर्ग होवून वाचनालयातील प्रथाची दुर्दशा होवू लागली आहे.अनमोल ग्रंथसंपदेची अशी हानी होणे कोणत्याही वाचनालयांना परवडणारे नाही.पुस्तकावर धुळीचा थर साचून प्रग खराब होत आहेत. 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.