जत ग्रामीण भाग व्हायरल इन्फेक्शनच्या विळाख्यात

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गेल्या काही दिवसात होत असलेल्या रिमझिम पावसामुळे ग्रामीण भागात

डासांच्या संख्येत वाढ झाल्याने ताप,सर्दी,अंगदुखीचे रुग्ण बळावत आहे.मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून यावर

प्रतिबंध घालण्यासाठी औषध फवारणी सारख्या ठोस उपाययोजना दिसत नसल्याचे चित्र आहे. 
ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे हवामानात बदल होत आहे. व्हायरल इन्फेक्शनच्या विळाख्यात सापडला आहे.यांचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे.विविध आजाराला बळी पडत आहेत.आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने लक्ष घालून उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.ग्रामीण भागात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असते.
मात्र पावसाळ्यात जागोजागी सांडपाणी व गावालगत पाण्याचे डबकी साचलेले आढळुन येते.बहुतांश गावात गटारी सफाईचे कामे सातत्याने होत नसल्याने सांडपाणी निचरा होत नाही.परिणामी डासांचे प्रमाणात वाढ होऊन आजाराला आयतेच निमंत्रण मिळत आहे.कोरोनामुळे जत शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरीक हैराण आणि भयभीत आहेत. 

Rate Cardत्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक व्यवस्था पुरती कोलमडलेली

असतांना आरोग्याचा खेळ मात्र आर्थिक संकटात टाकत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत प्रशासनाकडून डासांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ व त्यामुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.


 पुर्वी होत असलेल्या फवारणीमुळे डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळत असे, मात्र अलीकडे हा प्रकार बंद झाल्याचे दिसुन येत असल्याने आरोग्याचा प्रश्न जटील होतांना दिसत आहे. आरोग्य प्रशासकीय यंत्रणेकडुन उपाययोजनेची गरज असताना मात्र तसे होताना दिसत नसल्याचे पहावयास मिळत असल्याने तालुक्यातील जनतेचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.