तासगाव पोलीस ठाण्याची व्हॅन पलटी

0तासगाव – मणेराजुरी रोडवर महिला तंत्रनिकेतनजवळ घडली दुर्घटना : सुदैवाने कोणीही जखमी नाहीतासगाव : तासगाव पोलीस ठाण्याची एम एच 10, एन 2544 ही व्हॅन सोमवारी रात्री उशिरा पलटी झाली. तासगाव – मणेराजुरी रस्त्यावरील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.


Rate Cardयाबाबत माहिती अशी, तालुक्यातील योगेवाडी येथे किरकोळ वाद झाल्याने होमगार्ड व पोलीस तासगाव पोलीस ठाण्याच्या मोठ्या व्हॅनने घटनास्थळाकडे निघाले होते. ही व्हॅन शासकीय महिला तंत्रनिकेतनजवळ आल्यानंतर पाठीमागून एक दुचाकीस्वार अचानक ओव्हरटेक करून पुढे गेला. या दुचाकीला लाईट नव्हती. त्यामुळे पोलीस व्हॅनच्या चालकाला दुचाकी दिसली नाही. परिणामी ही दुचाकी पुढे जात असताना अपघात टाळण्याच्या प्रयत्नात पोलीस व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटला. 
ही व्हॅन रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटी झाली. दरम्यान ‘तो’ दुचाकीस्वार भरधाव वेगात पुढे निघून गेला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. रात्री उशिरा क्रेन आणून पलटी झालेली व्हॅन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.