विजापूर-गुहागर महामार्ग कामात गती नाही

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील सर्वाधिक धोकादायक विजापूर-गुहागर महामार्गाचे  काम अनेक अडचणीनंतर सुरू आहे.मात्र कामात गती नसल्याने रस्ता पुर्ण होण्यासाठी पुढील काही महिने जाण्याची शक्यता आहे. 
शहरातील हा महत्वाचा मार्ग आहे.त्याचे काम सुरू आहे.शहरातील काम अनेक वर्षानंतर सुरू करण्यात आले आहे.निगडी कॉर्नर ते चडचण रोडपर्यतच्या मार्गाचे काम रखडले आहे.गेल्या आठ दिवसात शहरात तुफान पाऊस पडला आहे.त्यामुळे हा मार्ग दबला असून पावसाच डब्यात पाणी साठून धोका निर्माण झाला आहे. वाहन धारकांना या मार्गावरून वाहने चालविताना कसरत करावे लागत आहे.


Rate Cardतर चडचण रोड ते बसस्टँड पर्यत रस्ता उखडला आहे.तेही काम महिन्यापासून आहे त्या स्थितीत बंद आहे.परिणामी रस्ता खोदला असल्याने बाजार समिती व आसपासचे पावसाचे पाणी स्टँडसमोर थेट रस्त्यावर थांबत आहे. त्यामुळे मार्गावर ओढा वाहत असल्याची स्थिती निर्माण झाला आहे. दिवसभर अशी स्थिती असून गुडघाभर थांबलेल्या पाण्यातून वाहने काढत वाहनाची धोकादायक वाहतूक सुरू होती.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.