शेगाव,वाळेखिंडीत तूफान पाऊस | पुर्व भाग अजून कोरडाच ; उत्तर,पश्चिम भागातील ओढ्यांना पुर

0



जत,प्रतिनिधी : शनिवारी रात्रि जत तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अभूतपूर्व पावसामुळे शेती, पिकांची मोठी हानी झाली. ठिकठिकाणी द्राक्ष, डाळिंब बागांत पाणी साचले आहे. पावसाने अनेक बागांची वाताहात झाली आहे.बनाळीसह अनेक गावात थेट उभी पिके,मोठे वृक्ष वाहून गेले आहेत.पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.




दरम्यान तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या पुर्व भागातील अनेक गावांना दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.शनिवारी मात्र याही परिसरातील संख,मुंचडी,व्हसपेठसह काही भागात दमदार पाऊस झाला आहे.



बोर,कोरडा नदीसह  अनेक ओढ्यांना पूर आला आहे. ठिकठिकाणी रस्ते, पूल खचले आहेत. अनेक गावांत घरे किंवा घरांच्या  भिंती पडल्या आहेत. तालुक्याला यंदा वरूणराजाने झोडपून काढले आहे. परतीच्या मोसमी पावसाचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाला आलेली खरीप पिके मात्र शेतात पाणी साठून  कुजू लागली आहेत.



तालुक्यात मान्सूनचा पाऊस पडत नाही. परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान तीनशे मिलिमीटर आहे. मात्र दोन वर्षांपासून सरासरीच्या दुप्पट पाऊस कोसळतो आहे. शनिवारी 27 मीमी पावसाची नोंद झाली.



दरम्यान, तालुक्यात मूग, उडीद, मटकी, भुईमूग, बाजरी पिके हातातोंडाला आली आहेत. मात्र पिके काढणीसाठी पावसाने उसंत दिलेली नाही. पिके शेतातच कुजून चालली आहेत. परिणामी रब्बीचा हंगाम पुढे जाणार आहे.या पावसाचा द्राक्ष डाळिंब, द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. डाळिंब बागात मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली आहे. जी फळे आली त्यांना पाकळी, करपा, फळकुज, तेलकट या बुरशीजन्य रोगांनी घेरले आहे. सततच्या पावसाने शेतकर्‍यांना औषधफवारणी करणे अवघड झाले आहे.

Rate Card



तालुक्यात कोरडा,भोर नदी आहे. पावसाने ही नदी,शेगाव,वाळेखिंडी,बनाळी,संख,डफळापूर परिसरातील ओढे,त्याशिवाय गावोगावचे लहान-मोठे ओढे व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत अतिवृष्टी, पाण्यात बुडून व भिंत पडण्याच्या दुर्घटना झाल्या आहेत.तालुक्यात नेहमी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे माळवदी घरांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आता अतिवृष्टीच्या तडाख्यात ही घरे टिकलेली नाहीत. जादा पाऊस पडल्याने माळवदी घरांना गळती लागली आहे. अनेक घरांच्या जाडजूड  जुन्या भिंती कोसळून घरे पडू लागली आहेत.तालुक्यातही अनेक गावात घरांची पडझड झाली आहे. 



पावसाने अनेक रस्त्याच्या ओढा पात्रावरील पूल खचला आहे. अनेक रस्ते व पुलांचे भराव वाहून गेले आहेत.त्याशिवाय अनेक गावात तुफान पावसाचे पाणी पिकातून वाहिल्याने पिके  वाहून गेली आहेत.



उत्तर भागातील आंवढी,लोहगाव कोरडेच


जत तालुक्यातील उत्तर भागातील वाळेखिंडी, कासिलिंगवाडी,शेगाव,बनाळी,वायफळ परिसरात तूफान पाऊस झाला.सर्वत्र ओढे,नाले,तलाव ओसांडून वाहत आहेत.तर उत्तर भागातील आंवढी,लोहगावला शनिवारी झालेल्या पावसाने बगल दिली आहे.दोन्ही गावात रिमझिम वगळता दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.



जत तालुक्यात झालेल्या पावसाची काही दृश्य

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.