संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग कोरोना पॉझिटिव्ह
आंवढी,वार्ताहर : संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आंवढीचे संरपच आण्णासाहेब कोडग यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आंवढीतील कोरोना लढाईत संरपच कोडग यांनी कोरोना योध्दाप्रमाणे काम केले होते.तालुक्यात पहिल्या टप्यात कोरोनाचा फैलाव आंवढीमध्ये झाला होता.यादरम्यान आंवढीतील कोरोनाची साखळी तोडत प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी तालुका प्रशासनाशी समन्वय साधत काम केले होते.
अशा गावासाठी झोकून देऊन कोरोना योध्दा काम करणारे आण्णासाहेब कोडग यांना कोरोना सदृश हलकी लक्षणे आढळून आली होती.त्यांची रवीवार रँपीट टेस्ट घेण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्याशिवाय आंवढीतील अन्य एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे. माझी तब्येत ठणठणीत आहे.नागरिकांनी कोरोनाला गंभीर घ्यावे,सर्वांनी खबरदारी घेऊन स्व:तासह कुंटुबाचे संरक्षण करावे,असे आवाहन कोडग यांनी केले आहे.