जतेत कोरोना रोकण्यात कापड व्यापाऱ्यांचे योगदान ; पांडुरंग बामणे

0



जत,प्रतिनिधी : जत शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाची साखळी रोखण्यासाठी जत शहर कोरोना नियंत्रण समितीने जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या जनताकर्फ्युला जत शहरातील कापड व्यापाऱ्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देऊन एक प्रकारे देशभक्ती केली आहे.जत शहरात वाढलेला कोरोनाचा फैलाव रोकण्याची मोठी गरज होती.




त्यापार्श्वभूमीवर कोरोना समितीच्या आवाहनानुसार दहा दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता.त्यात जत शहरातील इतर दुकानदाराप्रमाणे कापड व्यापाऱ्यांनी यात मोठे योगदान देत प्रतिसाद दिला.यापुढेही कापड दुकानात कोरोना प्रतिबंधित उपाय योजना केला आहे. सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर,सँनिटायझरचा वापर करावा,असे आवाहन असोसिएशन अध्यक्ष पांडुरंग बामणे यांनी केले.

Rate Card


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.