जत,प्रतिनिधी : भारत,महाराष्ट्र सरकार स्वस्तधान्यच्या माध्यमातून कोरोना काळात सरकार धान्याची मोठी मदत करत आहे.मात्र जत तालुक्यात अशी मदतीतील धान्यावर स्वस्तधान्य दुकानदाराकडून डल्ला मारत शासन नियमातील धान्यात गाळा मारत धान्य कमी दिले जात आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोफत व दोन,तीन रुपये किलोदरांने गहू,तांदुळ स्वस्तधान्य वितरण करण्यात येत आहे.
ते नागरिकापर्यत पोहचविण्याची जबाबदारी असणाऱ्या तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदाराकडून शिधापत्रिका धारकांना छळत आलेल्या धान्यात कपात करून गाळा मारणे,जीवनावश्यक वापरायचे बाहेरील साहित्य घेणे बंधनकारक करून जादा किंमतीला शिधाधारकावर लादण्याचे प्रकार बेधडक सुरू आहेत.याकडे जतचा कमिशन खोर पुरवठा विभागाच्या दुर्लक्षाने गरीब नागरिकांच्या धान्याची लुट केली जात असल्याचा आरोप युवा नेते विक्रम ढोणे यांनी केला आहे.
विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनात नागरिकांना मदत म्हणून शासनाकडून मोफत व दोन,तीन रूपये किलो दरांने गहू,तांदुळ व डाळीचा पुरवठा करण्यात आला आहे. हे साहित्य जत तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानदाराकडून वितरण करण्यात येत आहे. यात मोफत व कमी दरातील गहू,तांदुळ एकत्रच वाटप करण्यात येत आहे.त्यात शिधाधारकाच्या गहू,तांदुळात गाळा मारला जात आहे. मशिनमधून पावत्या न देताच तुमचे एवढेच धान्य आले आहे,म्हणून कमी धान्ये देऊन दमबाजी केली जात आहे.
यात मोठ्या प्रमाणात धान्याची धान्य दुकानदाराकडून लुट केली जात आहे.सध्या अडचणीत असलेल्या नागरिकांना या स्वस्त धान्याचा आधार आहे.त्यातही गाळामारी,जादा दर,अन्य साहित्य बंधनकारक करून ते साहित्य अवाच्यासव्वा दराने शिधाधारकावर लाढत थेट तिहेरी राजरोसपणे लुट केली जात आहे. तक्रार करणाऱ्या शिधाधारकांना दमबाजी केली जाते,कुठे तक्रार करायची तेथे कर म्हणून दमबाजी करण्यात येत आहे. करजगी येथील धान्यदुकानमुळे हा प्रकार समोर आला आहे. पुरवठा विभागाचे दुर्लक्षामुळे शासनाकडून आलेले धान्य धान्य दुकानदाराकडून मध्येच गिळकृत्त करण्याचे उद्योग थांबवावेत अन्यथा आंदोलन करू असा इशारा ढोणे यांनी दिला आहे.
संख,ता.जत येथील धान्य दुकाना समोरील गर्दी या धान्याची गरज आधोरेखित करत आहे.





