राजे रामराव महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संजय लट्ठे यांना उत्कृष्ट संशोधक पुरस्कार

0



जत,प्रतिनिधी : राजे रामराव महाविद्यालय, जत येथील पदार्थविज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय सुभाष लट्ठे यांना नुकताच उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक १२ ते १३ सप्टेंबर २०२० या काळात ट्रीची, तामिळनाडू येथे अभियांत्रिकी, विज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र या विषयावर आयोजित केलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय संशोधक पुरस्कार परिषदेत डॉ. संजय लट्ठे यांचा बहुमान करण्यात आला.

डॉ. संजय लट्ठे यांनी संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून २०१० साली पीएचडी पदवी संपादन केली असून इस्तंबूल -तुर्की (२०१०-१२), – साउथ कोरिया (२०१२-१३), आणि टोकियो – जपान (२०१३-१५) येथे सलग ५ वर्षे संशोधन केले आहे. तसेच जपान येथील नोबेल पुरस्कार संवाद (२०१५), जर्मनी येथे ६६ वी नोबेल पुरस्कार विजेते बैठक (पदार्थविज्ञानातील ३४ नोबेल पुरस्कार विजेत्यांबरोबर संवाद, जून २०१६),व चीन मधील ब्रिक्स परिषदेत (जुलै २०१७) सहभाग नोंदवला आहे. त्यांची हेनान विद्यापीठ, चीन येथे अतिथी प्राध्यापकपद (२०१८ व २०१९) आणि उपसमिती सदस्य, भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (जून २०१८) साठी निवड झाली. त्यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ची पीएचडी मार्गदर्शक मान्यता (जून २०१९) मिळाली असून ०४ संशोधक विद्यार्थी पीएचडीचे संशोधन करत आहेत. २०१६ पासून सलग चार वर्षे डॉ. संजय लट्ठे यांची जपान सरकारकडून “जपान-आशिया यूथ एक्स्चेंज प्रोग्राम इन सायन्स” या योजनेअंतर्गत निवड झालेली आहे. या योजनेअंतर्गत त्यांनी जपान सरकारच्या खर्चातून आत्तापर्यंत राजे रामराव महाविद्यालयातील एकूण ०७ गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना जपान येथील टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स येथे ०३ आठवड्यासाठी संशोधन प्रशिक्षण दिले.

त्यांच्या नावे एक चायनीज पेटंट मंजूर असून ५५ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, ०४ आंतरराष्ट्रीय समीक्षा शोधनिबंध, १६ राष्ट्रीय शोधनिबंध, ०४ पुस्तक अध्याय प्रसिद्ध असून ७० हुन जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविला आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनॉलोजि, न्यू दिल्ली कडून ३५ लाख, इंडिया सायन्स अँड रिसर्च फेलोशिप कडून १.७ लाख, नॅशनल नॅचरल सायन्स फौंडेशन, चीन कडून २० लाख असे संशोधनासाठी आर्थिक सहकार्य लाभले आहे. त्यांनी सलग ०५ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून जपान, कतार, टर्की, दक्षिण कोरिया, चीन, बांगलादेश, आफ्रिका, नेपाळ येथील संशोधकांना जत सारख्या दुष्काळी भागातील राजे रामराव महाविद्यालयात बोलावून संशोधन संवाद घडवून आणला. तसेच त्यांनी राजे रामराव महाविद्यालय जत आणि टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स, जपान व हेनान युनिव्हर्सिटी, चीन यांच्याबरोबर आंतराष्ट्रीय सामंजस्य करार घडवून आणला. राजे रामराव महाविद्यालयामध्ये बी एस्सी व एम.एस्सी. (पदार्थविज्ञान) मध्ये सर्वोच्च क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जपानचा “फुजीशिमा – तेराशिमा” पुरस्कार (जून २०१७) सुरु केला त्यांना जत येथील

Rate Card

अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान कडून “डी. वाय. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार (५ सप्टेंबर २०१९)” देऊन गौरविण्यात आले.

त्यांना कठीण आर्थिक परिस्थितीतून शिक्षण चालू ठेवल्याबद्दल “एकलव्य पुरस्कार” सांगोला विद्यामंदिर, सांगोला (१९९९), आर्थिक द्ष्ट्या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेला “एकलव्य पुरस्कार” शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (२००५.०७), पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून “कमवा व शिका” शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर योजनेत दाखल झाल्याबद्दल कै. बाजीराव भीमराव देसाई आणि श्रीमती सोनाबाई बाजीराव देसाई पुरस्कार” (२००५) आणि “कमवा व शिका शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शिक्षण घेत असताना पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल “निवृत्त शिक्षक शिष्यवृत्ती (२००६), विद्यापीठ अनुदान आयोग, न्यू दिल्ली, मार्फत ज्युनियर रिसर्च फेलोशिप (२००८-१०), “वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद”, न्यू दिल्ली, मार्फत सिनिअर रिसर्च फेलोशिप (२०१०) मिळाली आहे.

प्रा. डॉ. संजय सुभाष लट्ठे यांना पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. भोसले, डॉ. श्रीकांत कोकरे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. एस. ढेकळे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डॉ. लट्ठे यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.