जतमध्ये कोरोनाबाबातचा बेफीकीरपणा पुन्हा समोर

जत,प्रतिनिधी : जत शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने जत शहरातील खाजगी हॉस्पिटल कोविडं सेंटरसाठी ताब्यात घेतलेली आहे.या कोविडं सेंटर मधील वापरतात आलेले पीपीए किट, मास्क व हॅन्ड गोज हे जत नगरपरिषदेच्या मार्फत गोळा करून जत शहरापासून जवळच असलेल्या शिंदे वस्ती येथे असलेल्या कचरा डेपो मध्ये उघड्यावर जाळला जातो.हे प्रकरण जिवंत असतांना जत सांगली रोड लगत झाडाखाली वापरलेले 2 पीपीए किट पडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ठिकाणी सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी वयोवृद्ध नागरिक तसेच तरुण मंडळी वॉकिगसाठी जात असतात.नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ते किट उचलून घंटागाडी मध्ये टाकले. पण प्रत्यक्षात ती गाडी जिथे पीपीए किटची विल्हेवाट लावली जाते,तिथे जाणे आवश्यक होते.तसे न होता ती गाडी आरळी कॉर्नर येथे आढळून आली. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घ्यावे व जो दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केले.
जत शहरातील सांगली रोडकडेला पडलेले पीपीई किट