नव्याने बांधलेली गटार फुटली
जत,प्रतिनिधी : जत शहरातील प्रभाग एकमधील विठ्ठल नगर परिसरात गटारी,रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत.त्यात दर्जा हा संशोधनाचा विषय ठरला आहे.मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही दर्जेदार कामाचा फज्जा उडाला आहे.
नव्याने केलेल्या रस्त्याचे सीमेंट उखडू लागले आहे.गटारीचे सींमेट एकाच पावसात वाहून गेल्याने गटारीच्या तारा उघड्या पडल्या आहेत.मोठी विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे.या भागात गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामाच्या दर्जाची तपासणी करावी,अशी मागणी होत आहे.

जत प्रभाग एकमध्ये गटारीचे सीमेंट वाहून गेल्याने तारा उघड्या पडल्या आहेत.