जत शहरात खड्ड्याची डबकी बनली

0
7



जत,प्रतिनिधी : जत शहरातील राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या शेगाव-अथणी रोडवर जत शहरातील पॉश भागातील हिरो शोरूमजवळ पाच फुटाचा मोठा खड्डा संबंधित विभागाचा बेजबाबदार पणा चव्हाट्यावर आणत आहे.

शहरातील महत्वाचा मार्ग असणाऱ्या या परिसरातील पाणी गटारी नसल्याने थेट रस्त्यावर सोडले जाते.त्याशिवाय पावसाचे पाणी वाहून जाण्याला मार्ग नसल्याने ते पाणी थेट रस्त्यावर थांबत आहे.त्यातच अवजड वाहतूक करणारी वाहनाची जा-ये असल्याने रस्ता दबला जाऊन संपूर्ण रस्त्यावर पाच फुटाचा खोल खड्डा पडला आहे.

त्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाचे पाणी साटून मोठे डबके बनले आहे.यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोेरे जावे लागत आहे.दुचाकी व पायी जाणाऱ्या नागरिकांनी थेट मार्ग बदलला आहे.

जत-अथणी रोडवरील भला मोठा खड्डा जीवघेणा ठरत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here