हजारो प्रकारच्या काडेपेटी संग्रह बनविणारा अवलिया.

0

 

Rate Card

या जगात संग्रह अनेक प्रकारचे आहेत , अनेकांना काही ना काही छंद असतोच जसे काडेपेटी,नोटा,कॉइन,पोस्टकार्ड , पेन,आरसे,पुस्तके,खेळणी अशी कितीतरी प्रकारचे संग्रह करणारे या जगात विखुरलेले आहेत.त्यापैकीच एक अवलिया श्री नासिर संदे. इस्लामपूर, यांच्यामुळे इस्लामपुरातील काडेपेटी संग्रह बनले आकर्षणाचे स्तोत्र,जे खरोखरच मानवी मनाला आकर्षित करतात.संदे हे आष्टा येथे अण्णासाहेब इंजीनियरींग काँलेज मध्ये संगणक विभागात काम करत आहेत.नासिर संदे यांना बालपणापासूनच वेगवेगळे छंद जोपासण्याची आवड,मित्रांसोबत त्यावेळी काडेपेटी जमवण्याचा हा त्यांचा रोजचा खेळ होता.

 तेव्हा पासून मात्र संग्रह करण्याचा एक छंदच मनात घर करून गेला.आणि आज अखेर गेल्या पस्तीस वर्षात खूप मोठा संग्रह झाला.आज जवळपास तीन हजार विविध काडेपेटीचा संग्रह कसा झाला हे कधी कळलच नाही.1 इंच लहान काडेपेटी पासून 6 ते 12 इंच इतक्या मोठ्या काडेपेटीचे अनेक प्रकार त्यांच्याकडे पाहायला मिळतात.प्रत्येक काडेपेटीचा रंग, डिझाईन,वेगवेगळे फुले, पक्षी,प्राणी,खेळणी,क्रिकेट,खेळाडू,हीरो हीरोइन,वाहने,राष्ट्रीय पक्षी,राष्ट्रीय प्राणी, देवदेवता,म्युझिक वाद्य,नेते,स्वातंत्र्यदिन, घरगुती वस्तू, इंटरनेट,गुगल,व्हाट्सअप अशा प्रकारचे एक ना हजार प्रकार, आणि म्हणूनच या काडेपेटी वर असलेली विविधता म्हणजेच,

त्यांच्या असे निदर्शनास आले की काडेपेटीचा रोजच्या वापराबरोबरच विविध भाषा,संस्कृती, धर्म,इतिहास,सणवार याबाबतची माहिती आपल्या सर्वां पर्यंत पोचवली जाते.हा ही एक चांगला उद्देश साध्य होत. मराठीत आपण काडेपेटी म्हणतो पण त्याचबरोबर त्याला हिंदीत माचिस म्हटलं जातं किंवा दियासलाई,तामिळमध्ये टिपणी , काश्मीरमध्ये मदक डब्ल्यू,तेलंग मध्ये अग्निपुत्र,बांगला मध्ये देशराई,गुजराती मध्ये दियासली,पंजाबी मध्ये दिलीपतीला,नेपाळमध्ये मेनसलाई अशी कित्येक नावे आहेत.त्याचबरोबर येणारे वेगवेगळे सणवार जसे होळी , गुरुपौर्णिमा,बेंदूर,कारगिल दिन,स्वतंत्रता दिन,शिक्षक दिन,गणेशोत्सव असे त्या त्या वेळप्रसंगी असणाऱ्या दिवसाच्या माचिस डिस्प्ले करून माचिस संग्रहाच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर शुभेच्छा देऊन भावनिक ओलावा निर्माण केला जातो.त्यांच्या असलेल्या अनेक व्हाट्सअप ग्रुपवरून अनेकांकडून शुभेच्छा मिळतात.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.