‘दाढी नाही रोजगार वाढवा’ सोशल मिडिया ट्रेंड | युवकांनी राष्ट्रीय बेरोजगार दिवस केला साजरा : रिपब्लिकन स्टुडंट युनियन
सांगली : करोनाच्या कालावधीमध्ये कोट्यवधी युवकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी 17 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय बेरोजगारी दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.
भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत.राष्ट्रीय बेरोजगारी दिवस या हॅशटॅगवर 20 लाख हून अधिक ट्विट काही तासातच करण्यात आले आहेत.
प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करणाऱ्या या भाजप सरकारचा तरुणांनी निषेध केला.आज देशात 63 टक्के युवक बेरोजगार आहेत.अनेक सरकारी कंपनी मोदी सरकारने मोडीत काढून त्याचे खासगीकरण, भांडवलशाही करून रोजगार संपवलेला आहे.

तसेच मागासवर्गीय नोकरीतील आरक्षण देखील यातून संपविले आहे.यामुळे युवकांमध्ये, नागरिकांमध्ये प्रचंड राग या सरकार विरोधात आहे.सरकारने या निर्माण केलेल्या बेरोजगारी, खासगीकरण, भांडवलशाही गुंतवणूक व आरक्षण विरोधी भूमिकेचे रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम , मानतेश कांबळे, गौतम भगत आदींनी तीव निषेध व्यक्त केला.