नगरपरिषद,पोलीसाच्यामुळे कोरोना वाढणार | संजय कांबळे, परशुराम मोरे यांचा आरोप ; प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बंदमध्ये दुकाने उघडली

0जत,प्रतिनिधी : जनता कर्फ्यू असतानाही जत शहरात नागरिक खुलेआम फिरतातच कसे,आम्ही विना मास्क विनाकारण फिरणाऱ्या नागरिकावर कारवाईसाठी पथक नेमल्याचे सांगणारे नगरपरिषद व पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे दृश्य गुरूवारी जतेत होते.
वाढत्या रुग्ण संख्येला अटकाव करण्याचा कोरोना समितीचा प्रयत्न एकीकडे यशस्वी होत असताना पुन्हा शहरातील मंगळवारी रस्त्यावर प्रमुख रस्त्यावर गर्दीमुळे पुन्हा कोरोना धोका बळवला आहे.या प्रकाराला प्रतिबंध करावा,अन्यथा आम्हाला नगरपरिषद व पोलीसाविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करावी,अशी मागणी जत शहर कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष आयु संजयरावजी कांबळे व समितीचे उपाध्यक्ष परशुराम मोरे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, जत शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या  ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आजपर्यंत जत तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही 791 इतकी झाली असून जत शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही 289 झाली आहे. कोरोनाने जत तालुक्यातील 27 लोकांचा बळी गेला आहे.असे असले तरी जत तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन तसेच जत नगरपरिषद यांना याचे काहीही गांभीर्य दिसून येत नाही. जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.ती रोखण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही ही खेदाची बाब आहे.
यासाठी आम्ही जत शहरातील सर्व पक्षीय संघटना तसेच राजकीय पक्षाची नेतेमंडळी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करित असताना आम्हाला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. जनताकर्फ्यु हा दहा दिवसांचा लावला असलातरी जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्यातील आडमुठेपणामुळे जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत जनताकर्फ्युच्या सातव्यादिवशी बहुतांशी व्यापारी वर्गाने आपली दुकाने उघडी करायला सुरुवात केली आहे. 

Rate Card
जत पोलीसांचे समोरच दुचाकीवर टिब्बलसिट बसून फिरणारे वाहनचालक,तोंडाला मास्क न लावता  फिरणारे लोक तसेच मास्क न लावता भाजी व फळे विकणारे विक्रेते यांच्याबाबतीत पोलीस व नगरपरिषद यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन ही कांबळे व मोरे यांनी केले आहे.

जत शहरात गुरूवारी बहुतांश दुकाने उघडल्याने मुख्य पेठेत अशी गर्दी होती.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.