वापरलेले पीपीए किट,मास्क,हँडग्लोजची उघड्यावर विल्हेवाट | जत नगरपरिषदेचा प्रताप : नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा ; परशुराम मोरे

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील कोविड रुग्णालयातील पीपीए किट,मास्क व हँन्ड ग्लोज नगरपरिषदेच्या  कर्मचाऱ्यांना गोळा करत,ते शहरापासून जवळ असलेल्या शिंदे वस्ती येथील कचरा डेपोत  टाकून त्यांची विल्हेवाट लावण्यात येत आहेत. मात्र त्यांची पुर्ण विल्हेवाट लावली जात नसल्याने आसपासच्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे,अशी माहिती माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी दिली.

मोरे म्हणाले,भयंकर रुप धारण केलेल्या कोरोनाबाबत नगरपरिषद प्रशासन पहिल्यापासून गंभीर नाही.सातत्याने जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाही नगरपरिषदेचे अधिकारी,पदाधिकारी काळजी घेत नाही.जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास प्रशासन कारणीभूत ठरत आहे.शहरात नव्याने चालू करण्यात आलेल्या कोविड सेंटर मधिल पीपीए किट,मास्क,व हँडग्लोजसह अन्य साहित्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नगरपरिषदेला देण्यात आली आहे. 
असे वापर झालेले पीपीए किट व अन्य साहित्य नगरपरिषदेचे कर्मचारी कालबाह्य सुरक्षा साधणे वापरत तेथून हाताने उचलून कचरा गाडीत टाकतात.तेथून पुढे शिंदे वस्ती नजिकच्या कचरा डेपोवर ते साहित्य उघड्यावर आग लावून नष्ठ करण्यात येते,मात्र हे साहित्य पुर्णत: नष्ट होईपर्यत कर्मचारी तेथे उपस्थित राहत नाहीत.परिणामी अर्धवट जळलेल्या या साहित्यामुळे डेपो लगतच्या आदाटे,चौगुले,शिंदे,नदाफ,माळी वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.Rate Cardमुळात हे पीपीए किट,मास्क व हँडग्लोज कोरोना बाधित रुग्णावर उपचार करत असताना वापरलेले असतात.त्यांची संपुर्ण विल्हेवाट लावण्याची गरज असतानाही नगरपरिषद प्रशासन विना परिक्षित कर्मचाऱ्यावर ही जबाबदारी लादून मोकळे होत आहे.परिणामी या साहित्याची वाहतूक व विल्हेवाट लावणारे कर्मचाऱ्यांच्या ही जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार निंदनीय असून नगरपरिषदेने याबाबतचे गार्भिर्यं ओळखून नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवावा,असेही मोरे यांनी आवाहन केले आहे.


जत शहरालगतच्या कचरा डेपोत असे अर्धवट पीपीए किट, मास्क,हँडग्लोज पेटवून विल्हेवाट लावली जात आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.