जलबिरादरीकडून खोल सलग समतल चर कामास प्रांरभ

0डफळापूर,वार्ताहर : जलबिरादरी कडून खलाटी येथील वनजमिनीवर डिप सि.सि.टी.(खोल सलग समतल चर)च्या कामाला सुरुवात करण्यात आली.

डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रेरणेने तसेच जलबिरादरी चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री.नरेंद्र चुग यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून “अग्रणी नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्प” या प्रकल्पांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी अग्रणी नदी खोऱ्यामधील प्रत्येक गावा गावात जलसंधारणाची वेगवेगळ्या प्रकारची कामे लोकसहभागातून राबवत आहे.
या सर्व कामातून आज अग्रणी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे.अग्रण नदी खोऱ्यामध्ये खानापूर,तासगाव,कवठेमंकाळषजत आणि मिरज या 5 तालुक्यातील 107 गावांचा समावेश आहे.त्या धर्तीवर खलाटीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खलाटी हे गाव आपल्या अग्रणी नदी खोऱ्यातील जत तालुक्यातील सर्वात उंचावरचे गाव आहे आपण नेहमी काम करत असताना “माथा टू पायता” या भूमिकेतून काम सुरू करण्यात आले आहे.
यापूर्वीही खलाटी गावात खलाटी ओढ्यावरती श्री लखाबाई मंदिराच्या शेजारी एक सिमेंट बंधारा बांधला आहे. तसेच या गावाला फॉरेस्ट जमीन जास्त असल्याने पूर्वी 30 हेक्टर वरती डीप सी.सी.टी.चे काम केले आहे. आणखीन 25 हेक्टर वनजमिनीवर डीप सिटीच्या कामाची सुरुवात केली आहे.

आजच्या या उद्घाटन प्रसंगी जलबिरादरीचे जिल्हा समन्वयक अंकुश नारायणकर,सागर साळुंखे,बालाजी चव्हाण,वनपाल आप्पासो पवार,वनरक्षक गोविंद नरोटे,शिवाजी संकपाळ. खलाटी गावचे प्रतिष्ठित नागरिक नरेंद्र कोळी,उपसरपंच अशोक जाधव, वनकमिटी अध्यक्ष नागेश बनसोडे, राहुल बनसोडे,नवनाथ कोळी, साहेबराव शेजुळ,नारायण शेजुळ,खंडेराव बनसोडे तसेच खलाटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rate Cardजत : जलबिरादरीकडून खोल सलग समतल चर कामास प्रांरभ करण्यात आला.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.