जतेत पुन्हा 44 नवे पॉझिटिव्ह | काटेकोर बंद पाळा ; परशूराम मोरे

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना बाधित नव्या 44 रुग्णाची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील बाधित संख्या 681 वर पोहचली आहे. शनिवारी जत शहर 11,खंडनाळ 8,भिवर्गी 4,मेंढिगिरी 2,बिळूर 5,माडग्याळ 1,गुळवंची 1,नवाळवाडी 1,निगडी खु.1,संख 1,रेवनाळ 3,कडेगाव 2 या गावातील रुग्णाचा समावेश आहे.

बिळूरमध्ये पुन्हा पाच रुग्ण पॉझिटिव्ह  आढळल्याने धोका बळवला आहे.त्याचबरोबर खंडनाळ 8,भिवर्गी 4 येथेही पॉझिटिव्ह रुग्ण एकदम आढळले आहेत.जत शहरासह तालुक्यातील बंहुताश गावे कोरोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा जनता कर्फ्यू लावून लॉकडाऊन करण्यात आली आहेत.जास्तीत जास्त तपासण्या घेण्यात येत आहेत.Rate Cardकोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्व प्रकारे प्रयत्न करत आहे.दुसरीकडे पोलीस दल मात्र बेफीकीर असल्याचे समोर येत आहे.जत शहरासह अनेक गावात उस्फुर्त बंद पाळण्यात येत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिकांचा बंद असतानाही विना मास्क वावर धोका वाढवत आहे.

अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीसाची गरज असतानाही पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप कोरोना समितीचे सदस्य तथा माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनी केला आहे.जत तालुक्यात आजपर्यत 410 जण कोरोना मुक्त झाले आहेत.245 जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.26 जणांचा मुत्यू झाला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.