खोजानवाडीत विजेचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मुत्यू
जत,प्रतिनिधी : खोजानवाडी ता.जत येथे एका तरूण शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून दुर्देवी मुत्यू झाला.मल्लाप्पा कांताप्पा तेली(वय 26,रा.खोजानवाडी)
असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी सहा वाजनेच्या दरम्यान ही घटना घडली.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, तरूण शेतकरी मल्लाप्पा तेली हा मंगळवारी सकाळी सहा वाजता घराजवळ असणाऱ्या शेतात मोटार चालू करण्यासाठी गेले होते.सकाळी पडलेल्या दवमुळे जमीन भिजल्याने मोटारीचे मुख्य प्रवाह व अर्टींग एकत्र झाले होते.

नेमके मल्लाप्पा यांचा पाय त्यावर पडल्याने त्यांना विजेता शॉक बसला.बराच वेळ मल्लाप्पा घरी परत आला नाही व मोटारही चालू नसल्याने वडील कांताप्पा मोटारीजवळ
गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. दरम्यान मल्लाप्पाचा जागेवर मुत्यू झाला होता.घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जत पोलीसात कळविली.