जत शहरातील रस्त्याची दैना | उपनरांत चालताही येईना ; रस्त्यावरून वाहू लागल्या सांडपाण्याच्या गटारी

0जत,प्रतिनिधी : दलदलयुक्त परिसर,राडेराड,दुर्गंधी यामुळे जतकरांची दैना झाली असून मुर्दाड लोकप्रतिनीधी,बेजबाबदार नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या मुळे शहरात जीव धोक्यात घालून नागरिकांना जगावे लागत आहेत.

सोमवार,मंगळवार सलग दोन दिवस शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.जोरदार झालेल्या पावसाने शहरातील मुख्य भाग,विजापूर-गुहागर रस्त्यासह विस्तारित भागातील रस्त्याची वाताहात झाली.प्रमुख असणाऱ्या विजापूर-गुहागर रस्त्यावरील खड्ड्यात डबकी तयार झाली होती.तर रस्त्यावरील मुरूमाची माती झाल्याने घसरगुंडी झाली आहे.

यामुळे अनेक दुचाकी घसरल्या.शहरातील महाराणा प्रताप चौक ते हनुमान मंदिर,हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत मुख्य रस्ता वगळता अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे.अनेक रस्त्यावरून पाणी वाहत आहे.खड्ड्यामुळे धोका निर्माण झाला आहे. तर मुरमीकरणाचे रस्त्ये चिखलमय झाले आहेत.शहरातील अनेक नगरांना चालतही जाता येत नव्हते.

Rate Card

शहरातील अनेक गटारीचे पाणी थेट लोकवस्तीतून वाहत असल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.याकडे नेमके कोन लक्ष देणार असा गहन प्रश्न नागरिकासमोर पडला आहे.जत शहरातील रस्त्यांना पांणद रस्त्याचे स्वरूप आले होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.