जत,प्रतिनिधी : जत बसस्थानकात कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नाही,शासनाने दिलेले नियम स्थानिक व्यवस्थापनाने धुळीस मिळविले आहेत.
त्यामुळे भविष्यात बसस्थानकांतून कोरोनाचा फैलाव वाढल्यास परिस्थिती गंभीर बनणार आहे.
जत शहरातील बसस्थानात दोघे कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत.सांगली विभागातही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित कर्मचारी आढळून आले आहेत.तरीही जत आगार प्रशासनाकडून गंभीरता बाळगली जात नाही.बसस्थानकात येणाऱ्या बसेसचे सँनिटायझर केले जात नाही.कर्मचाऱ्यांचे तापमान,ऑक्सीजन बघितले जात नाही.
सँनिटायझरचा वापर अपवाद दिसत आहे.कोरोना रुग्ण आढळूनही काळजी घेतली जात नाही.अशा प्रकाराने बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत स्थानक प्रशासनाकडे जाब विचारताच आगार व्यवस्थापक रजेवर असल्याचे सांगण्यात आले. कोरोना बाबत उपाय योजना आम्ही करत असल्याचे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान कोरोनाबाबत बसस्थानक प्रशासनाने अधिकारी,कर्मचारी, प्रवाशाच्या जीवाशी खेळू नये अन्यथा आंदोलन करू असा इशारा युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिला आहे.





