शासकीय कार्यालयासमोरील रस्ता धोकादायक

0



जत,प्रतिनिधी : जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कॉलेज कार्नर पर्यतचा जत – सांगली रस्ता प्रचंड धोकादायक बनला आहेत.शहरातील मुख्य पाईपलाईन पोलीस ठाण्यासमोर वारवांर लिकेज होत असल्याने सततच्या दुरूस्ती मुळे रस्त्यावर नाला बनला आहे.





पोलीस ठाणे व तहसीलदार निवासस्थान,कार्यालय येथे पाणी नेहण्याच्या पाईपलाईनसाठी अनेकवेळा मुख्य रस्ता विना परवाना खोदला आहे.त्यामुळे तेथे रस्ता दबला आहे.पाईपलाईन टाकलेल्या ठिकाणी नाले तयार झाले आहेत.तेथे एकतर खड्डा असतो किंवा मुरम टाकून चढे निर्माण केले जात आहेत.तर यादरम्यान  बाधकांम विभागने केलेले तीन गतीरोधक धोकादायक बनले आहे.


Rate Card




तहसीलदार निवासस्थाना समोर थेट रस्त्यावर पाणी थांबून राहिल्याने तेथे खड्डा पडला आहे.तर तहसील,पंचायत समिती,न्यायालय,प्रांत कार्यालयाने मान्यता दिलेले अतिक्रमण धारक हॉटेल चालक खरखट पाणी,राहिलेले अन्न पदार्थ,भांडी धुतलेले पाणी थेट रस्त्यावर टाकतात.त्यामुळे थेट रस्त्यावरून हे पाणी वाहत असल्याने गटारीचे स्वरूप आले आहे.जाणूनबुजून खड्डे बनविले जात असतानाही बाधकांम विभागाचे सुस्त अधिकारी या ठिकाणावरून जात असताना कानडोळा करत आहेत.परिणामी रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी,चारचाकी वाहन धारकांच्या मणके कमरेसह,शरीराला दणके बसत आहेत.तर वाहनाचे नुकसान वेगळेच आहे.दरम्यान या सर्वांच्या बेजबाबदार पणामुळे रस्ता मुर्त्यूचा सापळा बनला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.