डफळापूर – अंनतपूर रस्त्यात दोन ट्रक अडकले | महामार्ग की पाणंद रस्ता ; अनेकवेळा दुरूस्तीसाठी कोट्यावधीचा निधी उधळला

0



डफळापूर, वार्ताहर : डफळापूर – अंनतपूर रस्त्यात बाजू देताना दोन ट्रक खड्ड्यात दबल्याने दिवसभर या मार्गावरून जाणारी वाहतूक खंडित झाली होती.डफळापूर ते अंनतपूर या सुमारे बारा किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी आतापर्यत अनेक कोटीचा निधी सार्वजनिक बाधकांम विभागाने ठेकेदारांना पोसण्यासाठी उधळला आहे.प्रत्येक वेळ वाईट कॉलर मधून उथळ माथ्याने फिरणाऱ्या ठेकेदारांनी या रस्त्याच्या कामाला काळ्या डांबराची चकाकी आणून पैसे हाणले आहेत.





राज्य महामार्ग असणाऱ्या हा रस्ता अनेक वेळा करूनही पुन्हा पाच पाच फुटाचे खड्डे पडले आहेत.पाणंद रस्ता यापेक्षा बरा म्हणायची वेळ या मार्गावरून जाणाऱ्या वाहन धारकांना आली आहे.जत शहरातील एका ठेकेदारांने काही  महिन्यापुर्वी या रस्त्याचे रॉकेल मिश्रीत डांबराची चकाकी आणून डांबरीकरण केले आहे. तत्पुर्ती तुकडे तुकडे करून केलेल्या अन्य ठिकाणच्या रस्त्याच्या कामाला आता पाच पाच फुटाच्या भेगा पडल्या आहेत.अवजड वाहने जाऊन त्यांची चाके दोन्ही बाजूने दबल्याने मध्येच मोठा बांध तयार झाला आहे.





महाराष्ट्र, कर्नाटकला जोडणारा हा महत्वाच्या महामार्गाची दुराअवस्था झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन्ही विभागाच्या बेजबाबदार अधिकारी व निकृष्ठ काम करून लाखो रुपयावर डल्ला मारणारे ठेकेदार सर्वत्र मात्र उथळ माथ्याने फिरत आहेत.




बांधकाम विभागाचे भ्रष्ठ अधिकारी बदलण्याची गरज


Rate Card

जत तालुक्यातील गेल्या चार महिन्यात केलेले जवळपास सर्वच रस्ते उखडले आहेत.शासनाचा कोट्यावधीचा निधी या कामांना खर्च झाला आहे.यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टक्केवारीला सोकावलेल्या अधिकाऱ्यांमुळे हे रस्ते दर्जाहीन बन स आहेत.त्याचा वरदहस्त असल्याने सर्वच रस्त्याची कामे निकृष्ठ झाले आहेत.जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अशा भ्रष्ठ अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.




मुर्दाड ठेकेदार


जत तालुक्यातील काही प्रामाणिक ठेकेदार वगळता अनेक ठेकेदार मुर्दाड झाले आहेत.अशा ठेकेदारांनी अनेकवेळा कामे करूनही एका पावसातच ते उखडतातच कसे याबाबत संशोधन करण्याची गरज आहे. गुण नियंत्रण विभागाला ठरलेली रक्कम पोहच करण्याची खबरदारी हे ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी घेत असल्याने त्यांनी जत तालुक्यात रस्त्याची गुणवत्ता दर्जेदार असल्याचे एकप्रकारे प्रमाणपत्र दिल्याचे बोलले जात आहे.



डफळापूर-अंनतपूर(अथणी)रस्त्यावर दोन वाहने दबल्याने दिवसभर वाहतूक खोंळबली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.