तालुक्यात पुन्हा एकाचा मुत्यू,9 पॉझिटिव्ह | जत शहर गंभीर स्थितीत ; आता दुकाने सकाळी 9 ते सायं 7 पर्यंत सुरू राहणार

0

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. रविवारी पुन्हा एका कोरोना बाधिताचा मुत्यू झाला आहे.तर 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.त्यात जत शहर 4,धावडवाडी 2,माडग्याळ 2,उमराणी 1,रुग्णांचा रवीवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर शहरातील 58 वर्षाच्या इसमाचा जत ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधिताचा उपचार सुरू असताना मुत्यू झाला.त्यामुळे शहरासह तालुक्यात चिंता वाढली आहे.आतापर्यत तालुक्यातील रुग्ण संख्या 464 झाली आहे.
तालुक्यात 305 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 138 जणावर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आतापर्यत 21 जणांचे मुत्यू झाले आहेत.जत शहर कोरोना हॉटस्पॉट झाले आहे.शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
जत बंदचा निर्णयावर एकमत नाही

शहरात जनता कर्प्यू टळला असून व्यापाऱ्यांच्या बैठकीत यापुढे दुकाने सकाळी 9 ते सायकांळी सातपर्यत सुरू राहणार आहेत. तर दर शनिवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहेत.नियत्रंणासाठी समितीही नेमण्यात आली आहे.

शहरात ही समिती सोशल डिस्टसिंग,मास्क,सँनिटायझर,गर्दीवर नियंत्रण व कोरोनाचा फैलाव वाढणार नाही,यासाठी शहरातील व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करणे,सुचना देणे व प्रशासनाशी समन्वय साधत खबरदारी घेण्यासाठी काम करेल.

Rate Cardशहरातील व्यापाऱ्यांकडून खबरदारी

जत शहरातील व्यापाऱ्यांनी पूर्णत: खबरदारी घेतली जात आहे.दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांस मास्क लावणे,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझर देऊनच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे गेल्या पंधवड्यात बाजार पेठेत कोरोनाचा फैलाव रोकण्यात यश मिळाले आहे.प्रशासनाची ढिलाई

जत शहरात कोरोनाचा फैलाव रोकण्यात प्रशासनाची ढिलाई कारणीभूत ठरत असल्याचे आरोप होत आहेत.शहरातील आरोग्य विभाग सक्रिय आहे.मात्र कंन्टेटमेंट झोन,व इतर जबाबदारी असणारे महसूल व पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नाही.कन्टेंटमेट झोन मधील काही लोक सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत.तर पोलीसाकडून जरब कमी झाल्याने सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत आहे.पोलीस अधिकारी कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.शहरासह तालुक्यातील कोरोना प्रभाव रोकण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाने कडक शिस्त पाळणे क्रमप्राप्त आहे.अन्यथा धोका अटळ आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.