करोनाचा संसर्ग वाढला | नागरिकांनी घाबरू नये | नियम पाळा, काळजी घ्यावी

0



जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात करोनाचा समूह संसर्ग झाला आहे,मात्र लोकांनी घाबरू जाऊ नये, लोकांनी काळजी घ्यावी,करोनाची रुग्ण संख्या कमी असले की कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करणे सोपे जाते, मात्र समूह संसर्ग झाल्यानंतर रुग्ण संख्या वाढल्यावर कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करने थोडं कठीण असतं. मात्र तालुक्यात कॉन्ट्रॅक्ट ड्रेसिंग वर भर दिला जात आहे, एका पेशंटच्या मागे अकरा व्यक्तीं कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग केल्या जात आहेत. लोकांनी गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये,असे आवाहन जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील,आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले आहे.



कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण सांगली जिल्ह्यातील परिस्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयांची व्यवस्था अधिक बळकट करत आहोत. कोविड नियंत्रित आणण्याच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करत आहोत. 

सांगली जिल्ह्यातील व्हेंटिलेटरची संख्या, सर्व सेंटर्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. येत्या काळात जिल्ह्यातील मनुष्यबळही वाढवण्यात येईल. जिल्ह्यात एंटीजन टेस्ट केली जाईल.



Rate Card

 सर्व ठिकाणी औषधांचा साठा वाढवत आहोत. जिल्ह्यातील साध्या गाड्यांचं रुपांतर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये केले जाणार आहे.जिल्ह्यात सध्या 2018 खाटा आहेत.त्यापैकी 509 आयसीयू बेड्स आहेत.शिराळा, जत, इस्लामपूर, आटपाडी, विटा, कवठेमहांकाळ येथे आम्ही बेड्सची कमतरता भासू देणार नाही. अतिरिक्त बेड्सची व्यवस्था आठवड्याभरात केली जाईल. संभाव्य रुग्णवाढ लक्षात घेता सर्व खबरदारी घेणार आहोत.प्राथमिक आरोग्य केंद्रावरही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना गरज असेल त्यांना तात्काळ ऑक्सिजन पुरवले जाईल. तालुका स्तरावर कोविडसंबंधित औषधांचा पुरवठा वाढवला जाईल. 



महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून जास्तीत जास्त लोकांना सवलत कशी देता येईल त्याचा प्रयत्न करणार आहोत.कोविडला लोक अजूनही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. माझी विनंती आहे घराबाहेर पडू नका, सर्व नियमांचे पालन करा, घाबरून जाऊ नका, तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधा. घरी राहूनही कोविड बरा करता येतो. महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी सर्वकाही उपलब्ध करून देईल,असेही पालकमंत्री जयंत पाटील व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हटले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.