आमदार विक्रमसिंह सांवत कोरोना पॉझिटिव्ह | माझी तब्येत ठणठणीत ; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आ.सांवत यांचे आवाहन

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला आहे.नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळत सोशल डिस्टसिंग,मास्क,सँनीटायझरचा वापर करत खबरदारी घ्यावी,माझ्या संपर्कात आलेले पदाधिकारी, व नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.आमदार सांवत,त्यांचे चिरंजिव,चालक यांनाही कोरोनाची हलकी लक्षणे आढळून आल्याने,त्यांचा कोरोना चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना विलगीकरण करण्यात आले आहे.Rate Card

माझी तब्येत ठणठणीत आहे.जनतेनी माझी काळजी करू नये.तालुक्यात मोठ्या झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनापासून स्व:तासह कुंटुबियांचा बचाव करण्यासाठी सतर्क रहावे.सर्व ठिकाणी खबरदारी घेण्याच्या आरोग्य,महसूल,पोलीस प्रशासनाला मी सुचना दिल्या आहेत.तालुक्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी बेडची संख्या वाढविण्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू आहे.त्याशिवाय शहरातील दोन खाजगी हॉस्पिटल कोविड सेंटर करण्यात आले आहेत.तेथे दोन दिवसात उपचार सुरू होतील.शहरातही ग्रामीण रुग्णालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृह येथे कोरोना बाधित रुग्णावल तातडीने उपचार करावेत अशा सुचना दिल्या आहेत.टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे. औषधाचा साठा वाढविण्यात आला आहे.सर्व स्थानिक प्रशासनांला खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचेही आमदार सांवत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.