उत्कर्षा कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

0
4



डफळापूर,वार्ताहर : कॉम्रेड हणमंत कोळी यांची कन्या कु.उत्कर्षा कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीमध्ये अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. 



प्राजक्ता फौंडेशन व हिराई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल जत यांच्या संयुक्त विद्यमाने डफळापूर येथील सवदे बंधू हॉल येथे हे आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.शिबिराचे उद्घाटन प्रंसगी जत पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक उत्तम जाधव, कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कोळी,डॉ.सुदर्शन घेरडे सर,माजी मार्केट कमिटी संचालक अभिजीत चव्हाण, जत पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,डॉ.राजेंद्र झारी, डॉ.विनोद माळी,डॉ.गुरूशांत माळी,सवदे उद्योग समुहाचे अशोक सवदे,कॉ मिना कोळी सरिता पवार,ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर शिंगे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.गौस मकानदार, अमिर नदाफ,अतुल शिंदे,विशाल शिंदे,दिपक कांबळे,नितिन पाटील, अशोक स्वामी, शरद सकट,वृषभ कोळी यांनी नियोजन केले.


डफळापूर : कॉ.हणमंत कोळी यांची कन्या उत्कर्षा कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना पो.नि.उत्तम जाधव,आप्पासाहेब कोळी व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here