शहरातील रस्त्याची पुन्हा वाट | अधिकाऱ्यांची डोळ्यावरची पट्टी निघणार का ? : सर्वच रस्ते फुटले

0जत,प्रतिनिधी : जतमध्ये बुधवारी पुन्हा पावसाने दणादाण उडवली.तब्बल अर्धा तास पडलेल्या दमदार पावसाने शहरातील रस्त्याची दरवेळीप्रमाणे वाट लावली.वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ आली.पायी चालणाऱ्या नागरिकांचे तर बेहाल झाले.शहरातील प्रमुख मार्ग शहरातील विजापूर-गुहागर मार्ग,आरळी कॉर्नर ते पोलीस ठाणेपर्यतचा सांगली रोड,शेगाव रोड ते यल्लम्मा मदिंरापर्यत सांगोला-अथणी मार्गाची आवस्था पांणद रस्त्यासारखी झाली आहे.तीन-तीन फुटापर्यत पडलेले खड्डे त्यातच पावसाचे पाणी साटल्याने डबकी तयार झाली आहेत.शहरातील ही अवस्था नवी नाही.मात्र बुधवारी पडलेल्या पावसाने पुन्हा बेहाल झाले.जत शहरातील खाबूगिरीमुळे बांधकाम विभाग व नगरपरिषदेने नव्याने केलेले अनेक रस्ते गेल्या महिन्यातील पावसाने वाहून गेले आहेत.सर्वत्र खड्डे,खड्डे अशी काहीशी जत शहरातील रस्ते बनले आहेत.त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. काही अपवाद वगळता शहरासह उपनगरातील रस्त्याची वाट लागली आहे.अधिकाऱ्यांच्या टक्केवारीने असे रस्ते करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग,नगरपरिषदेचा बांधकाम विभागाचे अधिकारी खाबूगिरीला सोकावले आहेत.त्यामुळे रस्ते करतानाच त्यांच्याकडून कसे रस्ते खराब होतील अशा पध्दतीने ठेकेदाराकडून कामे करून घेतली जात असल्याचे आरोप आहेत.

Rate Cardसातत्याने रस्ते खराब व्हावेत व पुन्हा निधीची उधळपट्टी करता यावी असा उद्देश्य यामागे अधिकाऱ्यांचा आहे.यात काही लोकप्रतिनिधी ठेकेदारांचा सहभाग नागरिकांच्या पाठीच्या कण्याला दणके देत आहेत.खड्ड्याच्या या रस्त्यामुळे जवळपास प्रत्येक दुचाकी चालकांला पाठीचे आजार जडले आहेत.जत शहरातील आरळी कॉर्नर ते पोलीस ठाण्यापर्यत रस्त्याची अवस्था अधिकाऱ्यांच्या आंधळेपणाचे साक्ष देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.