जतचे माजी नगराध्यक्ष इकबाल गंवडी यांचे निधन

0जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक इक्बाल उर्फ पटुभाई मौला गवंडी (वय 58) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. गवंडी हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते, त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, सोमवारी दुपारी त्यांची उपचारा दरम्यान मुत्यू झाला.Rate Card

 गवंडी हे सलग 35 वर्षे जत शहराच्या

राजकारणातील वजीर म्हणून सक्रिय होते. माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले त्यांचे राजकारण शहरात ताकतवान बनले होते.ग्रामपंचायत,नगर परिषद खत  ते सलग 30 वर्षे निवडून येत होत.सद्या ते पालिकेचे विद्यमान नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते म्हणून काम करत होते. त्यांनी जत ग्रामपंचायतीचे सरपंच.पालिकेचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य,नगरसेवक अशा पदांवर काम केले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.