संख बलात्कार प्रकरणातील आरोपी जेरबंद | उमदी पोलीसांनी घेतले आंध्रप्रदेशमधून ताब्यात ; 4 दिवस पोलीस कोठडी

0जत,प्रतिनिधी : संख बलात्कार प्रकरणातील फरारी आरोपी टोपन्ना मायाप्पा हुबनुर (रा.संख ता.जत)याला उमदी पोलीसांनी 18 दिवसानंतर आंध्रप्रदेश राज्यातील कोडीगणहल्ली ता.परगी,जि.अंनथपुर येथून ताब्यात घेतले.त्याला सांगली सत्र न्यायालयात हजर केले असता,त्याला न्यायालयांने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.संख येथील वयोवृद्ध महिलेवर 11 ऑगष्ट रोजी मध्यरात्री टोपन्ना मायाप्पा हुबनुर यांने बलात्कार केला होता.तेव्हापासून गेली वीस दिवस संशयित हुबनूर फरारी होता.त्याला अटक करावी म्हणून,रिपाई,दलित पँथर,शिवसेना,वंचित आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यापार्श्वभूमीवर पोलीसांनी दोन पथके नेमत कर्नाटक राज्यात शोध सुरू केला होता.पथकांनी धार्मिक स्थळे, हुबनूरच्या नातेवाईकांकडे शोध सुरू केला होता.मात्र संशयित पोलीसांना गुंगारा देत होता.अखेर ता.29 रोजी उपनिरिक्षक एन.बी.दांडगे यांचे कर्नाटक राज्यात शोध घेत खबऱ्याकडून संशयित हुबनूर आंध्रप्रदेश राज्यातील कोडीगणहल्ली ता.परगी,जि.अंनथपुर येथे असल्याची माहिती मिळाली होती.पथकाने तेथे छापा टाकत संशयित आरोपीला अटक केली.


Rate Card


त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा,विभागीय पोलिस अधिकारी संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर,उपनिरिक्षक नामदेव दांडगे,महेश मोहिते,फौजदार कोळी,हेड कॉन्टेबल गडदे, वळसंग,खरात,अकुल,व्हनखंडे,घोदे यांच्या पथकांने ही कारवाई केली.
 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.