जत बाजारपेठेतील कंन्टेनमेंट अखेर हटविला

0
8



जत,प्रतिनिधी : जत शहरातील मुख्य बाजार पेठेतील प्रतिबंधित क्षेत्र अखेर हटविला.जत शहरातील महाराणा प्रताप चौकात एका व्यापारी कोरोना बाधित आल्यानंतर या परिसरात प्रशासनाने कंन्टेनमेंट झोन करत मुख्य बाजारपेठच स्टेट बँकेपर्यत अर्धी बंद केली होती.

दरम्यान बाधित व्यापाऱ्यांच्या कुंटुबातील बाधित रुग्ण संख्या पुन्हा वाढल्याने झोन पुढे वाढविण्यात आला होता.दरम्यान मुख्य बाजार पेठ बंद असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होऊ लागल्याने तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे कन्टेनमेंट झोन कमी करण्याची मागणी केली होती.

त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र कमी करत काही व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची मुभा दिली होती.बुधवारी बाधित व्यापाऱ्यांसह सर्वजण कोरोना मुक्त झाल्याने हा झोन अखेर मागे घेण्यात आला आहे.त्यामुळे सुमारे पंधरा दिवसानंतर बाजारपेठ सुरू झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here